संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile

Watch "pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile" on YouTube https://youtu.be/b6PydTDMbT0
नमस्कार मित्रांनो
★ ✅इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संगणकाची गरज नाही
★ ✅फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचा फोटो स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र स्कॅनर ची गरज नाही
★✅ऑनलाईन फॉर्म भरा तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर अगदी सोप्या पद्धतीने
★✅तुमच्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे फोटो आणि documents कसे स्कॅन करायचे ? त्यासाठी camscanner या अँप चा कसा वापर करायचा हे वरील व्हिडिओत दाखवले आहे
★✅online फॉर्म भरताना स्कॅन केलेल्या फोटोंची size 50 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे
मग तुमच्याकडील फोटोंची size कशी कमी करावी याची अहिती या व्हिडिओत आहे
★✅वरील व्हिडिओत अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याची माहिती दिली आहे
★✅तेव्हा इंटरनेट कॅफे किंवा तद्न्य व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही हा व्हिडीओ पहा आणि स्वतःच्या शाळेतील शिष्यवृत्ती फॉर्म स्वतःच भरा
★ ✅एक फॉर्म भरूनच पहा , 

------------------------------------
माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना नक्की शेअर करा ��

www.lmcschools.blogspot.in
8888390948

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

* रजा नियम *


==========================
▶महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१◀
==========================
     महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व शिक्षक व सरकारी नोकरांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.नोकरी लागल्यापासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
    महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-------------------------------------------------
      शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवाकाळात विविध प्रकारच्या रजा मिळत असतात. त्या उपभोगत असतांना सेवेत त्याचे महत्व व परिणाम आपणांस माहिती असावी तर जाणून घेऊ-

▶महाराष्ट्र नागरी सेवा(रजा)नियम-१९८१◀

                  महाराष्ट्र नागरी सेवा(रजा) नियम-१९८१ या अधिनियमात साधारणतः नियम-१ ते ९७ असून विविध रजांची सविस्तर माहिती आहे.
⏺रजाविषयक सर्वसामान्य अटी:-नियम-१० :-
------------------------------
       रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याचा कामावर गैरहजर असल्याचा परवाना. रजेचा अर्ज केल्यावर  रजा मिळेलच असे नाही. सर्वस्वी हा शासनाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.सार्वजनिक हितार्थ रजा मंजूर, नामंजूर करणे हे अधिकार शासनाचे आहेत.
⏺रजेची मंजूरी नियम-११ ते २२:-
-----------------------------------------
१)रजा मंजूर करतांना शिल्लक रजा,पूर्वी घेतलेली रजा,रजा मुदतीत व्यवस्था, प्रकार, कारण व अपेक्षिलेली रजा यांचा विचार केला जातो.
२)अनेक प्रकारच्या रजा संयुक्तपणे घेता येतील.
३)अपवादात्मक परिस्थितीत खास प्रकरणांसह पाच वर्षांपेक्षा जास्त रजा सलगपणे घेता येत नाही.
४)रजा मुदतीत अन्य नोकरी स्वीकारता येणार नाही.
⏺किरकोळ रजा:-
-------------------------
निश्चित नियमांनी उपबंधित करता येणार नाही अशा विशेष परिस्थितीत देण्यात येते.
शासकीय कर्मचारी (शिक्षकेत्तर)यांना ८ दिवस .
मुख्याध्यापक व शिक्षक यांना १२ दिवस किरकोळ रजा मिळते.
   एकावेळी सुट्टी कालावधी धरून ७ दिवसांपेक्षा जास्त घेता येणार नाही.तसेच या रजेस जोडून दीर्घ रजा घेता येणार नाही.
देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार
▶अ) सामान्य प्रकार:-
~~~~~~~~~~~~~~
१)अर्जित रजा (नि.५० ते५४)-
~~~~~~~~~~~~~~~~
-  सुट्टया मिळणाऱ्या खात्याव्यतिरिक्तच्या सेवकास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे मिळते.
-  मुख्या. व शिक्षक यांना प्रत्येक सहामाहीस ०५ दिवस मिळतात.
-  एका वेळेस १८० दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाहीत.
-  जास्तीत जास्त ३०० दिवस साठवता येते.
-  रजा पुर्ण दिवसात मंजूर करावी.
-  निलंबन काळ सहामाहीत समाविष्ट नसतो.
२)अर्धपगारी रजा(नि.६०):-
~~~~~~~~~~~~~~~
-  शासकीय सेवकास वर्षासाठी २० मिळतात.
-  वैद्यकीय अथवा खाजगी कारणासाठी मिळेल.
-  रजा साठवण्यास किंवा एका वेळी घेण्यास बंधन नाही.
-  यात वेतन ५० टक्के तर महागाई भत्ता,घरभाडे, पूरक भत्ता पूर्ण मिळतो.
३)परावर्तित रजा (नि.६१):-
~~~~~~~~~~~~~~
अर्धपगारी रजेच्या गटात तर वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही.
४)नादेय रजा किंवा अनार्जित रजा (नि.६२):-
~~~~~~~~~~~~~~
कर्मचारी परत सेवेत हजर होईल अशी खात्री पटल्यानंतर ही रजा देता येते.ही कायम कर्मचारी यांनाच मिळते.
५)असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा (नि.६३):-
~~~~~~~~~~~~~~~~~
रजा शिल्लक नसतांना विशिष्ट बाब म्हणून दिली जाते.
▶ब) खास प्रकार:-
~~~~~~~~~~~
   याबाबतचा हिशोब स्वतंत्ररित्या ठेवला जात नाही.
१)विशेष विकलांगता रजा-
~~~~~~~~~~~~~~
सेवा बजावतांना शारीरिक अथवा मानसिक विकलांगता झाल्यास-कमाल २४ महिने देय पैकी १२० अर्जित रजेप्रमाणे वेतन नंतर अर्धपगार वेतन.
२)अध्ययन रजा (नि.८० ते ९३):-
~~~~~~~~~~~~~~~
  उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमाल २८ महिने.
३)प्रसुती रजा (नि.७४):-
~~~~~~~~~~~~~
-  फक्त स्त्री कर्मचाऱ्यास देय आहे.
-  ह्यात दोन अपत्य यांना १८० दिवस याप्रमाणे मंजूर होते.
- १ वर्षापर्यंत सेवा वेतन मिळत नाही.
-  २ वर्षापर्यंत सेवा अर्धपगारी रजा मिळते.
-  या रजेला जोडून देय व अनुज्ञेय रजा घेता येते.
-  शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढविला जाणार नाही. शासन निर्णय-२५/३/३०१३
-  गर्भपात अथवा मिसक्यारेज झाल्यावर ६ आठवडे रजा मिळते.
-  मूल दत्तक घेतलेल्या महिलेस १ वर्ष किंवा मुलाचे वय १ वर्ष होईपर्यंत रजा अनुज्ञेय आहे.
४)रूग्णालयीन रजा -(नि.७७):-
~~~~~~~~~~~~~~~~
वनरक्षक, तुरूंगरक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी यांना देय
५) खलासी यांना मिळणारी रजा-(नि.७८)
▶क)सेवानिवृत्तीशी निगडीत रजा-(नि.६६):-
▶ड)रोखीत रूपांतर होणाऱ्या रजा-(नि.६८):-
शिक्षकांना लागू नाही.

▶इ) प्रासंगिक रजा

mdm ची रोजची माहिती भरणे खूप सोपे आहे , अँड्रॉइड फोन ची गरज नाही आणि इंटरनेट ची हि गरज नाही

https://youtu.be/umxCO7aA8mk
✅mdm ची रोजची माहिती भरणे खूप सोपे आहे , अँड्रॉइड फोन ची गरज नाही आणि इंटरनेट ची हि गरज नाही
✅पुन्हा पुन्हा app डाउनलोड करण्याचीही गरज नाही ..
✅साध्या मोबाईल द्वारे sms पाठवून हि सहज माहिती भरता येते
✅तुमच्या मोबाईल मध्ये 1:30 चा अलार्म सेट करा
✅आणि अलार्म वाजला कि त्या दिवशीची माहिती sms स्वरूपात
तुमच्या साध्या मोबाईल द्वारे पाठवा
✅पहिला sms वरील व्हिडिओच्या सहाय्याने बनवा आणि नंतर रोज तोच sms forword करून त्यात उपस्थिती आणि मेन्यू बदलून 9223166166 ला पाठवा
✅ तुम्हाला sms received चा reply येईल झाले इतके सोपे आहे
✅अधिक माहिती साठी व्हिडीओ आणि त्याखालील description पहा ...
✅ व्हिडीओ discription मध्ये पाहून किंवा msg कॉपी पेस्ट करूनही sms तयार करू शकता 👍👍
हि माहिती उपयुक्त असेल तर इतरांना जरूर share करा
*Smart Work Is Better Than Hard Work !* 🙏

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

STUDENT portal वर विद्यार्थ्यांचे अधारकार्ड क्रमांक update करणे .

STUDENT portal वर विद्यार्थ्यांचे अधारकार्ड क्रमांक update करणे .
*आधार नोंदणी बाबत अत्यंत महत्त्वाचे* 
process 
महत्त्वाचे :-) File download व upload एवढेच काम आपल्याला online करायचे आहे बाकी सर्व काम ofline करायचे आहे हे लक्षात घ्यावे (besline test प्रमाणे )



१)सर्व प्रथम student portol वर जाऊन login करणे

२)त्या नंतर Excel या tab वर जाऊन download या su-tab वर जाणे

३)आपल्या  शाळेची प्रत्येक वगाँची file इयत्ता निहाय down load करणे

४)त्या नंतर सदर file आपल्या computer ला download ला save होईल

५) तदनंतर आपण सदर file ofline आपल्या computer ला open करणे

६) त्या नंतर J नावाची cell select करणे त्या नंतर माऊस right clik करून format cell सिलेक्ट करणे किंवा control 1 दाबणे

७) शेवटी तेथे number tab select करून select text select करून ok बटण दाबणे
८) सर्वात शेवटी file pd मध्ये घेऊन students login करून excell tab वर जाऊन upload करणे आपणास uplod successful असा sms आल्यावर काम पूर्ण झाले असे समजावे

टिप:-)  basline test प्रमाणे सर्व process आहे

*महत्त्वाचे :-) 
*सदर file मध्ये इतर कोणत्याही प्रकारचा बदल करू नये बदल केल्यास upload ला अडचणी निर्माण होऊ शकतात

*सदर file वर gender select करण्याची सुविधा उपलब्ध आहे

*सदर file मध्ये फक्त ज्यांचे मागील वषीँ आधार काडँ नोंद झालेली नव्हती अशाच विद्यार्थ्यांची नावे :'( invalid aadhar) आहेत हे लक्षात घ्यावे

*सदर file मध्ये आधार नंबर,विद्यार्थीचे आधार काडँ वरील पूर्ण नाव,आधारकाडँ वरील जन्म तारीख व लिंग ही माहिती अचुक आपणास नोंद करायची आहे त्या मुळे आपण विद्यार्थी कडून आधारकाडँ झेराँक्स गोळा केल्यास आपले काम सोपै होईल

* विहीत मुदतीत आपले काम पूर्ण करावे हि विनंती *  

गुरुवार, ७ जुलै, २०१६

text sms द्वारे शालेय पोषण आहार माहिती पाठवणे

      सध्या शालेय पोषण आहार योजनेतील सर्व माहिती दैनंदिन रोज ऑनलाईन भरावे लागत आहे
परंतु रोज ऑनलाईन माहिती भाराने खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि यासाठी संगणक , ANDROID मोबाईल , इंटरनेट इत्यादी साधनेही आवश्यक असतात पण यापेक्षा sms द्वारे माहिती पाठवणे अगदी सोपे असते
फक्त सुरुवातीचा sms काळजीपूर्वक माहिती वाचून पाठवला कि पुढचे सोपे जाईल
sms पाठवण्याची पद्धत  खालील प्रमाणे आहे ...



अँड्रॉइड मोबाईल वरून शालेय पोषण आहार माहिती ऑनलाइन भरणे




शालेय पोषण आहाराचे ANDROID APP डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 


काही निवडक योगासने

रविवार, २४ एप्रिल, २०१६

वर्षभरातील दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == बालिका दिन
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————————–
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————————-
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————————-
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————————-
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————————-
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२० जून == पित्र दिन
21 जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
————————————————————————-
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————————————————-
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
—————————————————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०५ सप्टेंबर == शिक्षक दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
————————————————————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
————————————————————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————————————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

बुधवार, १३ एप्रिल, २०१६

20 Animals and their homes: - (20 प्राणी आणि त्यांची घरे)

1. Lion – Den – (सिंह - गुहा)

2. Dog – Kennel – (कुत्रा - कुत्र्याचे घर/केनेल)

3. Mouse – Hole – (उंदीर - बीळ)

4. Sheep – Pen – (मेंढी - कोंडवाडा)

5. Bull - Cattle shed – (बैल -  गोठा)

6. Elephant – Jungle – (हत्ती - जंगल)

7. Hen – Coop – (कोंबडी - खुराडे)

8. Snake - Hole/ Burrow – (साप - बीळ)

9. Horse – Stable – (घोडा - तबेला)

10. Cow - Cattle shed – (गाय - गोठा)

11. Bird – Nest – (पक्षी - घरटे)

12. Monkey – Trees – (माकड - झाडे/ वृक्ष)

13. Pig - Sty – (डुक्कर - डुक्करवाडा)

14. Rabbit – Burrow – (ससा - बीळ)

15. Fish - Water (Pet fish live in aquariums) – (मासे -
पाणी(पाळलेले मासे  मत्सालयामध्ये/काचेच्या पेट्यांमध्ये राहतात)

16. Donkey – Stable – (गाढव - तबेला)

17. Goat – Pen – (शेळी/बकरी - कोंडवाडा)

18. Bee - Hive – (मधमाशी - मधमाशांचे पोळे)

19. Spider - Web/Cobweb – (कोळी - जाळे/ कोळ्यांचे जाळे)

20. Ant – Hill – (मुंगी - मातीचा ढीग/टेकडी/लहान डोंगर)

बुधवार, २३ मार्च, २०१६

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...