lmcschools लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lmcschools लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ जून, २०२६

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी खालीलप्रमाणे टप्पे आखता येतील:

१. पूर्व-नियोजन (समिती आणि जबाबदारी)

  • क्रीडा समितीची स्थापना: शाळेतील इतर शिक्षक आणि कर्मचारी यांची मिळून एक आयोजन समिती तयार करा. यात मैदान आखणे, साहित्य जमा करणे, आणि पंचांची (Referees) नियुक्ती करणे या जबाबदाऱ्यांचे वाटप करा.

  • दिनांक आणि वेळ निश्चिती: स्पर्धा किती दिवस चालणार (उदा. २ किंवा ३ दिवस) आणि तारखा निश्चित करा.

  • बजेट आणि साहित्य: पदके, चषक (Trophy), प्रमाणपत्रे, आणि खेळाचे साहित्य (उदा. चुना, शिट्टी, दोरी, चेंडू) यांची यादी करून खरेदी करा.

२. कुल (House) विभागणी आणि संघटन

  • गट तयार करणे: संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची चार कुलांमध्ये (Houses) समान विभागणी करा (उदा. लाल, निळा, हिरवा आणि पिवळा गट).

  • कॅप्टन आणि हाऊस मास्टर: प्रत्येक गटासाठी विद्यार्थ्यांमधून एक 'हाऊस कॅप्टन' आणि शिक्षकांमधून एक 'हाऊस मास्टर/इन्चार्ज' नियुक्त करा.

  • सहभाग नोंदणी: प्रत्येक गटातून वेगवेगळ्या खेळांसाठी खेळाडूंची नावे अंतिम तारखेच्या आधी जमा करून घ्या. एका विद्यार्थ्याला किती जास्तीत जास्त खेळांत भाग घेता येईल, याचा नियम ठरवा.

३. खेळांची निवड

मुलांच्या वयोगटानुसार खेळांची निवड करा:

  • वैयक्तिक खेळ: १०० मीटर, २०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची.

  • सांघिक मैदानी खेळ: कबड्डी, खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल, क्रिकेट.

  • बैठे खेळ (Indoor): बुद्धीबळ (Chess), कॅरम.

४. प्रत्यक्ष स्पर्धेचे वेळापत्रक

  • उद्घाटन सोहळा: प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून आणि विद्यार्थ्यांच्या 'मार्च पास्ट' (March Past) ने स्पर्धेचे उद्घाटन करा.

  • सामन्यांचे आयोजन: वेळापत्रकानुसार साखळी (League) किंवा बाद (Knock-out) पद्धतीने सामने खेळवा.

  • गुणदान पद्धत: प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुलाला (House) विशिष्ट गुण (Points) द्या (उदा. प्रथम - ५ गुण, द्वितीय - ३ गुण, तृतीय - १ गुण).

५. समारोप आणि बक्षीस वितरण

  • विजेता गट (Best House Trophy): ज्या कुलाने (House) सर्वाधिक गुण मिळवले आहेत, त्या गटाला 'सर्वोत्कृष्ट कुल' (चॅम्पियनशिप ट्रॉफी) देऊन सन्मानित करा.

  • सर्वोत्कृष्ट खेळाडू: स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका मुलाला आणि एका मुलीला 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' (Best Athlete) म्हणून गौरव करा.

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

*शिवकालीन वजने(मापे)-*.



*शिवकालीन वजने(मापे)-*.

 * अठवे- शेराचा 1/8
 * अडशेरि- अडीच शेर
 * अदपाव- अर्धा पावशेर
 * अदमण- अर्धा मण
 * अदशेर- अर्धा शेर
 * अधोली- अर्धी पायली
 * अंजली- ओजळभर पानी
 * आटके- अर्धा शेर
 * आढक- चार शेर, पायली
 * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
 * कार्त- पाव रत्तल
 * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
 * कुडव- आठ शेर
 * कुंभ- वीस खंडी
 * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
 * कोड- खंडी, वीस मण
 * कोळवे- शेराचा अष्ठमांश
 * खारी- 16 द्रोण, एक खंडी
 * गरांव- अर्ध गूंज माप
 * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
 * गुंज-  एक वजन परिमाण
 * चंपा- दोन शेर धान्याचे माप
 * चवाटके- छटाक
 * चवाळामण- एक प्रकारचा मण
 * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
 * चाळीसा- चाळीस शेरांचे माप
 * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
 * चिपटे- पावशेराचे माप
 * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
 * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
 * चोथवा- एक पायली
 * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
 * चौशेरी- चार शेरांचे माप
 * छटाकी- छटाक
 * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
 * टवणा- पांच शेरांचे माप
 * टांक- एक तोळा
 * टिपरी- मापी पावशेर
 * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
 * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
 * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
 * डोळा- 16 शेरांचे माप
 * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
 * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
 * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
 * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
 * नाकटी- दीड पावशेराचे माप
 * नाळके- एक माप
 * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
 * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
 * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
 * पड- मापी 2 शेर, पाउन शेर
 * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
 * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
 * पान- पावशेर
 * पाभ- एक प्रकारचे माप
 * पायली- चार शेरांचे माप
 * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
 * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
 * पिटके- अदपाव
 * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
 * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
 * भरा- धान्याचे एक माप
 * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
 * भार- आठ हजार तोळे वजन
 * मणखाण- सुमारे एक मण
 * मणका- एक मणाचे माप
 * मापटे- अर्धा शेर
 * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
 * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
 * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
 * मूठ- मुठभर धान्य
 * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
 * रोवळा- एक माप
 * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
 * वाल- तिन गूंजाभर वजन
 * वैताद- एक तृतयांश तोळा
 * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
 * शिरिद- पावशेर
 * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
 * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
 * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
 * साक- एक हाताची ओंजळ
 * सामाशी- सहा मासे वजनाचे
 * सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते


कालमापन/दिनदर्शिका

कालमापन/दिनदर्शिका

कालमापन किंवा दिनदर्शिकेवर प्रश्न विचारलेच जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अवघड वाटतात. मात्र खालील नियमांचा योग्य अभ्यास केल्यास आपण कमी वेळात अचूक प्रश्न सोडवू शकतो.

सामान्य वर्ष :-

1)    एकूण दिवस 365 म्हणजे एकूण आठवडे 52 + 1 अधिक दिवस.

2)    सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 1 दिवसांनी पुढे जातो.

    1 जानेवारी 1997 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 1998 ला बुधवार असेल.

3)    सामान्य वर्षांत फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. सामान्य वर्षांत फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो.

उदा. 4 फेब्रुवारी 2007 ला मंगळवार असेल तर 4 मार्च 2007 ला मंगळवारच असेल.

4)    सामान्य वर्षांत 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात.

5)    30 दिवसांच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार दोन दिवसांनी तर 31 दिवसांच्या महिन्यांनंतर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार तीन दिवसांनी पुढे जातो.

6)    1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला असतो.
लीप वर्ष :-

1)    ज्या वर्षांला 4 ने नि:शेष भाग जातो आणि ज्या वर्षांच्या शेवटी दोन शून्य असल्यास 400 ने नि:शेष भाग जातो ते लीप वर्ष होय.

उदा. 1980,1996, 2000,1600 इ. परंतु 1800 लीप वर्ष नाही.

2)    लीप वर्षांत एकूण 366 दिवस असतात. तसेच 52 आठवडे + 2 अधिक दिवस.

3)    लीप वर्षांत 2 दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार 2 दिवसाने पुढे जातो. उदा. 1 जानेवारी 2004 गुरुवार तर 1 जानेवारी 2005 गुरुवार + 2 = शनिवार

4)    लीप वर्षांत 1, 2 जानेवारीचे वार वर्षांत 53 वेळा तर इतर वार 52 वेळा येतात.

5)    1 जानेवारीला जो वार असतो, त्याचा पुढील वार 31 डिसेंबरला असतो.

6)    7 दिवसांचा एक आठवडा असतो, म्हणून प्रत्येक आठवडय़ाने तोच वार पुन्हा येतो.

उदा. 1 तारखेला जो वार तोच वार 8, 15, 22, 29 तारखेला येतो.

संपूर्ण वर्षांतील जादा दिवस :

जानेवारी = 31 दिवस म्हणजेच 4 आठवडे + 3 दिवस ( ए७३१ं) याप्रमाणे

    जाने    फेब्रु.    मार्च    एप्रिल    मे    जून   

      3       0/1      3         2         3     2

    जुल    ऑगस्ट    सप्टेंबर    ऑक्टो.    नोव्हें.    डिसेंबर

      3          3             2            3            2            3

महत्त्वाची उदाहरणे :-
प्र. 1.    एका लीप वर्षांतील स्वातंत्र्यदिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताकदिनी कोणता वार असेल?

पर्याय :    1) रविवार    2) गुरुवार    3) शुक्रवार    4) शनिवार

स्पष्टीकरण : 15 ऑगस्टला जर शुक्रवार असेल तर सर्वप्रथम आपण 15 जानेवारीचा वार काढू.   

जादा दिवस = जुलचे 3 + जुनचे 2 + मे 3 + एप्रिल 2 + मार्च 3 + फेब्रुवारी 1 + जाने. 3 = 17 दिवस जादा

म्हणून : 177 = बाकी 3 म्हणजे शुक्रवारच्या मागे 3 दिवस = मंगळवार म्हणजे 15 जानेवारीला मंगळवार येतो म्हणजे 22 जानेवारीला (मंगळवारच + 4) असेल म्हणून 26 जानेवारीला शनिवार असेल.

प्र. 2.    अमितचा वाढदिवस 23 मार्च 2005 रोजी बुधवारी असेल तर 9 सप्टेंबर 2005 ला कोणता वार असेल?

पर्याय :    1) मंगळवार    2) गुरुवार    3) शुक्रवार    4) सोमवार

स्पष्टीकरण :  पद्धत एक :  23 मार्च ते 9 सप्टेंबपर्यंत दिवस

= 8 + 30 + 31 + 30 + 31 + 31 + 9 = 170 दिवस

म्हणून  1707   = 24 आठवडे + 2 दिवस

जर 23 मार्चला बुधवार असेल तर 9 सप्टेंबरला बुधवार + 2 = शुक्रवार असेल.

पध्दत दुसरी : 2005 हे सामान्य वर्ष असल्याने

जादा दिवस = 8 + 2 + 3 + 2 + 3 + 3 + 9 = 30

(जादा दिवसांचा तक्ता अभ्यासावा)

म्हणून 307  = 4 आठवडे + 2

जर 23 मार्चला बुधवार असेल तर 9 सप्टेंबर ला  बुधवार + 2 = शुक्रवार असेल.   
प्र. 3. अमितचा जन्म 26 एप्रिल 2001 रोजी बुधवारी झाला असेल तर  2 मे 2005 रोजी कोणता वार असेल.

पर्याय :    1) शनिवार    2) रविवार    3) सोमवार    4) शुक्रवार

या प्रकारचे उदा. पुढील पद्धतीने सोडविल्यास कमीत कमी वेळात कमी आकडेवारी करून अचूक सोडविता येते.

म्हणून 117  = एक आठवडा + 4 दिवस 

जर 26 एप्रिल 2001 ला बुधवार असेल तर 2 मे 2005 ला (बुधवार + बाकी उरलेले 4 दिवस) = रविवार असेल.

वरील प्रकारचे उदाहरणे खालील नियम वापरून सोडवावेत.

1)    सर्वप्रथम तारीख व महिना यांचा वेगवेगळा गट करावा .

2)    लहान तारखेपासून मोठय़ा तारखेकडे (उदा. 26 एप्रिल लहान तर 2 मे मोठी याप्रमाणे) या तारखेकडे बाणांची दिशा दाखवावी.

3)    जर बाण (ण्) खाली असेल तर (+) चिन्ह लिहावे व जर बाण वर () असेल तर खाली (-) चिन्ह लिहा.

4)    जादा दिवस म्हणजे दोन तारखेंमधले दिवस तसेच जादा वर्ष म्हणजे वर्षांची वजाबाकी + त्या वर्षांमधील लीप वर्ष यांना मांडणी वरून योग्य ते चिन्ह देऊन त्यांची बेरीज करावी व त्यांना 7 ने भागून बाकी काढावी. म्हणजे दिलेल्या तारखेच्या वारात येणारी बाकी मिळविल्यास प्रश्नात विचारलेल्या तारखेचा वार मिळतो.
प्र. 4. 20 ऑगस्ट 2005 ला शनिवार असेल तर 5 ऑगस्ट 2002 ला कोणता वार असेल?

पर्याय :    1) शनिवार     2) बुधवार    3) सोमवार    4) मंगळवार

स्पष्टीकरण : 23 मार्च ते 9 सप्टेंबपर्यंत दिवस =

म्हणून -197  = दोन आठवडा – 5 दिवस

जर 20 ऑगस्ट 2005 ला शनिवार होता तर 5 ऑगस्ट 2002 ला शनिवार – 5 = सोमवार होता.
प्र. 5.    जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल?

पर्याय :    1) सोमवार    2) बुधवार    3) मंगळवार    4) रविवार

स्पष्टीकरण : शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो तर गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यांमधील जादा दिवस = 25 +2 = 27

    म्हणून 277  = बाकी 6

    जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर गांधी जयंती मंगळवार + 6 = सोमवारी असेल.
प्र. 6. अमित हा अमरपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे. अमितचा जन्म शनिवारी झालेला असल्यास अमरचा जन्म कोणत्या वारी झाला?

पर्याय :    1) बुधवार    2) सोमवार    3) रविवार    4) मंगळवार

स्पष्टीकरण : अमितचा जन्म जर शनिवारी असेल तर अमरचा जन्म शनिवार -3 =बुधवारी झालेला असेल.
प्र. 7.    जर मार्चच्या 4 तारखेला मंगळवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटचा शनिवार कोणत्या तारखेला असेल?

पर्याय :    1) 28 मार्च    2) 29 मार्च    3) 22 मार्च    4) 15 मार्च

स्पष्टीकरण : जर 4 मार्चला मंगळवार आहे म्हणून 11, 18, 25 मार्च मंगळवारच असेल म्हणून महिन्याचा शेवटचा शनिवार  4 दिवसांनी म्हणजे 25 + 4 = 29 मार्चला असेल.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- ४, प्र. २- ३, प्र. ३- २, प्र. ४- ३, प्र. ५- १, प्र. ६- २, प्र. ७- २.

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

🌷इथे संपली माणुसकी

एकदा एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. पण वाट पाहुनही त्या दिवशी सावज काही मिळाले नाही. 
          शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्याजवळ  थांबला.हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणीप्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांने जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण
उडाली.
          वर अस्वल,खाली वाघ! आता काय करायचं ?
तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव
वाचविण्या
साठीच इथे आलोय."

        माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखालीच बसून हे दोघे कधी खाली येतील यांची वाट पाहत होता.रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
           वाघाने खूप खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण विश्वासू व ईमानदार अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. ठरल्याप्रमाणेच आता माणूस जागरण करू लागला व अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं हीच  संधी साधली.तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल.
"माणसानं क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने माणसाचा स्पर्श होताच अस्वलाला जाग आली होती व चतुराईने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले. त्यामुळे ते पडलं नाही.पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.ते म्हणालं,"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस."पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."

🌸तात्पर्य ध्यानात ठेवा🌸

        पाठीत खंजर खुपसून कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे,हेआपल्या हातात आहे.

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.मानसातली माणुसकी एवढी खाली का आली ? एवढा खालच्या पातळीवर तो का आला ? पशू पेक्षाही खालच्या थराला का गेला ? याचे आत्मचिंतन होण्याची गरजआहे.अस्वलाने दिलेला शाप म्हणूनच की, काय आज माणसं चोरी करायला लागले अन्  कुत्री त्याला शोधू लागली.लक्षात घ्या की, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणारया असतात, याउलट जो दुसरयाला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

* रजा नियम *


==========================
▶महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१◀
==========================
     महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व शिक्षक व सरकारी नोकरांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.नोकरी लागल्यापासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
    महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-------------------------------------------------
      शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवाकाळात विविध प्रकारच्या रजा मिळत असतात. त्या उपभोगत असतांना सेवेत त्याचे महत्व व परिणाम आपणांस माहिती असावी तर जाणून घेऊ-

▶महाराष्ट्र नागरी सेवा(रजा)नियम-१९८१◀

                  महाराष्ट्र नागरी सेवा(रजा) नियम-१९८१ या अधिनियमात साधारणतः नियम-१ ते ९७ असून विविध रजांची सविस्तर माहिती आहे.
⏺रजाविषयक सर्वसामान्य अटी:-नियम-१० :-
------------------------------
       रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याचा कामावर गैरहजर असल्याचा परवाना. रजेचा अर्ज केल्यावर  रजा मिळेलच असे नाही. सर्वस्वी हा शासनाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.सार्वजनिक हितार्थ रजा मंजूर, नामंजूर करणे हे अधिकार शासनाचे आहेत.
⏺रजेची मंजूरी नियम-११ ते २२:-
-----------------------------------------
१)रजा मंजूर करतांना शिल्लक रजा,पूर्वी घेतलेली रजा,रजा मुदतीत व्यवस्था, प्रकार, कारण व अपेक्षिलेली रजा यांचा विचार केला जातो.
२)अनेक प्रकारच्या रजा संयुक्तपणे घेता येतील.
३)अपवादात्मक परिस्थितीत खास प्रकरणांसह पाच वर्षांपेक्षा जास्त रजा सलगपणे घेता येत नाही.
४)रजा मुदतीत अन्य नोकरी स्वीकारता येणार नाही.
⏺किरकोळ रजा:-
-------------------------
निश्चित नियमांनी उपबंधित करता येणार नाही अशा विशेष परिस्थितीत देण्यात येते.
शासकीय कर्मचारी (शिक्षकेत्तर)यांना ८ दिवस .
मुख्याध्यापक व शिक्षक यांना १२ दिवस किरकोळ रजा मिळते.
   एकावेळी सुट्टी कालावधी धरून ७ दिवसांपेक्षा जास्त घेता येणार नाही.तसेच या रजेस जोडून दीर्घ रजा घेता येणार नाही.
देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार
▶अ) सामान्य प्रकार:-
~~~~~~~~~~~~~~
१)अर्जित रजा (नि.५० ते५४)-
~~~~~~~~~~~~~~~~
-  सुट्टया मिळणाऱ्या खात्याव्यतिरिक्तच्या सेवकास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे मिळते.
-  मुख्या. व शिक्षक यांना प्रत्येक सहामाहीस ०५ दिवस मिळतात.
-  एका वेळेस १८० दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाहीत.
-  जास्तीत जास्त ३०० दिवस साठवता येते.
-  रजा पुर्ण दिवसात मंजूर करावी.
-  निलंबन काळ सहामाहीत समाविष्ट नसतो.
२)अर्धपगारी रजा(नि.६०):-
~~~~~~~~~~~~~~~
-  शासकीय सेवकास वर्षासाठी २० मिळतात.
-  वैद्यकीय अथवा खाजगी कारणासाठी मिळेल.
-  रजा साठवण्यास किंवा एका वेळी घेण्यास बंधन नाही.
-  यात वेतन ५० टक्के तर महागाई भत्ता,घरभाडे, पूरक भत्ता पूर्ण मिळतो.
३)परावर्तित रजा (नि.६१):-
~~~~~~~~~~~~~~
अर्धपगारी रजेच्या गटात तर वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही.
४)नादेय रजा किंवा अनार्जित रजा (नि.६२):-
~~~~~~~~~~~~~~
कर्मचारी परत सेवेत हजर होईल अशी खात्री पटल्यानंतर ही रजा देता येते.ही कायम कर्मचारी यांनाच मिळते.
५)असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा (नि.६३):-
~~~~~~~~~~~~~~~~~
रजा शिल्लक नसतांना विशिष्ट बाब म्हणून दिली जाते.
▶ब) खास प्रकार:-
~~~~~~~~~~~
   याबाबतचा हिशोब स्वतंत्ररित्या ठेवला जात नाही.
१)विशेष विकलांगता रजा-
~~~~~~~~~~~~~~
सेवा बजावतांना शारीरिक अथवा मानसिक विकलांगता झाल्यास-कमाल २४ महिने देय पैकी १२० अर्जित रजेप्रमाणे वेतन नंतर अर्धपगार वेतन.
२)अध्ययन रजा (नि.८० ते ९३):-
~~~~~~~~~~~~~~~
  उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमाल २८ महिने.
३)प्रसुती रजा (नि.७४):-
~~~~~~~~~~~~~
-  फक्त स्त्री कर्मचाऱ्यास देय आहे.
-  ह्यात दोन अपत्य यांना १८० दिवस याप्रमाणे मंजूर होते.
- १ वर्षापर्यंत सेवा वेतन मिळत नाही.
-  २ वर्षापर्यंत सेवा अर्धपगारी रजा मिळते.
-  या रजेला जोडून देय व अनुज्ञेय रजा घेता येते.
-  शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढविला जाणार नाही. शासन निर्णय-२५/३/३०१३
-  गर्भपात अथवा मिसक्यारेज झाल्यावर ६ आठवडे रजा मिळते.
-  मूल दत्तक घेतलेल्या महिलेस १ वर्ष किंवा मुलाचे वय १ वर्ष होईपर्यंत रजा अनुज्ञेय आहे.
४)रूग्णालयीन रजा -(नि.७७):-
~~~~~~~~~~~~~~~~
वनरक्षक, तुरूंगरक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी यांना देय
५) खलासी यांना मिळणारी रजा-(नि.७८)
▶क)सेवानिवृत्तीशी निगडीत रजा-(नि.६६):-
▶ड)रोखीत रूपांतर होणाऱ्या रजा-(नि.६८):-
शिक्षकांना लागू नाही.

▶इ) प्रासंगिक रजा

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. १३


✳  खड्यातुन संख्या शिकणे.

             या उपक्रमामध्ये केवळ ९ खड्यांतून मुले एक अंकी संख्या , १८ खड्यांतून दोन अंकी संख्या , २७ खड्यांतून तीन अंकी संख्या तसेच ३६ खड्यांतून चार अंकी संख्या लिहितात व वाचतात. याप्रमाणेच कृती केल्यास मुले कोटी पर्यतच्या संख्या वाचन व लेखन करतात.

✳ कार्यपद्धती :

एकक साठी खड़े रंग - काळा
दशक साठी खड़े रंग - पांढरा
शतक साठी खड़े रंग - पिवळा
हजार साठी खड़े रंग - हिरवा
          यापद्धतीने खड्याना रंग देऊन घेणे. वर्गात साधारण १५ ते २०सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ रेखाटून घेणे. आता एका मुलाला ठराविक अंतरावरून केवळ काळे ९ व पांढरे ९ खड़े वर्तुळात टाकण्यास सांगावे. वर्तुळात पडलेले खड़े केवळ विचारात घ्यावेत व वर्तुळाबाहेरील खड़े बाजूला ठेऊन द्यावेत. वर्तुळात पडलेल्या खड्यांपैकी प्रथम पांढरे खड़े मोजावेत व नंतर काळे खड़े मोजावेत.
       उदाहरणार्थ :
     गोलात १८ खड्यांपैकी ६ काळे खड़े व ७ पांढरे खड़े पडले. यात प्रथम पांढरे खड़े मोजावेत , डायरेक्ट ७ असे न मोजता १०,२०,३०,......,७० असे मोजावेत. व नंतर काळे खड़े मोजताना मोजलेले पांढरे खड़े सत्तर आणि काळा खड़ा एक ७१ व पुढे ७२,७३,७४,७५,७६ असे मोजावेत.
          यापद्धतीने ९९ पर्यन्तच्या संख्या पहिलीचे मुले १५ दिवसात तयार करु शकतात. याप्रमाणेच २७ खड़े घेऊन ९९९ पर्यंतच्या संख्या तर ३६ खड़े घेऊन ९९९९ पर्यंतच्या संख्या पहिलीचे मुले देखील तयार करतात. पुढे वेगळ्या रंगाचे खड़े वापरून हजारच्या पुढील संख्याही तयार करता येतात.

✳ या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य होतात :

१) मुर्त वस्तु संबोधाकडुन मुले संख्या संबोधा कडे जातात.
२) गोलात खडे टाकताना मुले आनंदायी पध्दतीने संख्या शिकतात .
३) घोकम पट्टी शिवाय संख्याचे दृढीकरण होते .
४) लहान वयोगटासही संख्या पटकन समजण्यास मदत होते.
५) एकक ,दशक, शतक ,हजार हे स्थानिक संबोध समजतात.

         या उपक्रमाचा सराव घेतल्यानंतर इ .३री च्या वर्गात मला आलेला अनुभव असा की, जी मुले संख्यावाचनात चुका करत होती , पाठीमागे होती ती मुले अतिशय आनंदाने व दडपणाशिवाय संख्या वाचन व लेखन करू लागली .
अगदी  पहिलीच्या वर्गास याच पध्दतीने सराव दिल्यानंतर ती मुले देखील ३ अंकी संख्या लवकरात लवकर वाचायला लागली. कुमठे बीटातील राकुसलेवाडी शाळेतील शिक्षक श्री .सुतार सर यांच्या कल्पनेतून कृतीत आलेला हा गणिती संख्या खेळ सर्वांना नक्कीच आवडेल.
          धन्यवाद!!!

                   गौरी पाटील
          उपशिक्षिका - चांदोरी मुले,
          ता.- निफाड, जि. नाशिक.

♦ गणितातील गंमत-जमत♦

नमस्कार मित्रानो,
दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक इयत्ता चौथी पाठयक्रमात आहे. तोच घटक आनंददायी पद्धतीने घेता येतो. या घटकाच्या सरावाबरोबर वजाबाकीचा देखील सराव यातून घेता येतो.हे सर्व थोर भारतीय गणित तज्ञ श्री.काप्रेकर यांचा स्थिरांक 6174 मुळे... काप्रेकरांनी हे इ.स.1949 मध्ये शोधून काढलं.यालाच 'काप्रेकारांचा स्थिरांक 1949' म्हणून ओळखलं जातो.

यांच्याविषयी वाचलं आणि याचा आज चौथी वर्गात वापर केला.खूप छान प्रतिसाद मिळाला.
चला तर मग जाणून घेऊया..
'काप्रेकर स्थिरांक-6174 '
====================
��प्रथम अशी चार अंकी संख्या निवडा, की त्यातील अंक सारखे नसतील म्हणजे (1111 किंवा 2222 नसतील अशी.

��त्या संख्येतील अंकांपासून मोठयात मोठी व लहानात लहान संख्या बनवून त्याची वजाबाकी करा.

��त्याचे जे उत्तर येईल त्यापासून परत ही कृती करा.आणि असे परत परत करत राहा.

��काही स्टेप ओलांडल्यानंतर दरवेळी उत्तर 6174 च येते.

प्रत्यक्ष उदाहरण पाहूत.
��आपण 2013 ही संख्या घेऊ.
त्यापासून मोठयात मोठी- 3210
लहानात लहान - 0123
याची वजाबाकी
3210 - 0123= 3087

��आलेल्या उत्तरापासून परत वरील प्रमाणेच कृती करुत.
8703 - 0378 = 8352
8532 -2358 = 6174
7641 - 1467 = 6174
��अशाप्रकारे परत परत तीच संख्या येते. 6174 हा काप्रेकरांच्या क्रियेचा गाभा आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य देखील...

��������������������
याचे फायदे पाहूत.
१) लहान मोठी संख्या सरावासाठी मनोरंजक पद्धती.

२)मुलं आवडीने संख्या बनवतात व उदाहरणे सोडवतात.

३)जलद गणिती उदाहरण सोडविण्याची स्पर्धा निर्माण होते.

Try it amazing..

धन्यवाद..!������

���� संकलन ����
    उमेश कोटलवार

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...