Saturday, December 10, 2016

pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile

Watch "pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile" on YouTube https://youtu.be/b6PydTDMbT0
नमस्कार मित्रांनो
★ ✅इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संगणकाची गरज नाही
★ ✅फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचा फोटो स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र स्कॅनर ची गरज नाही
★✅ऑनलाईन फॉर्म भरा तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर अगदी सोप्या पद्धतीने
★✅तुमच्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे फोटो आणि documents कसे स्कॅन करायचे ? त्यासाठी camscanner या अँप चा कसा वापर करायचा हे वरील व्हिडिओत दाखवले आहे
★✅online फॉर्म भरताना स्कॅन केलेल्या फोटोंची size 50 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे
मग तुमच्याकडील फोटोंची size कशी कमी करावी याची अहिती या व्हिडिओत आहे
★✅वरील व्हिडिओत अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याची माहिती दिली आहे
★✅तेव्हा इंटरनेट कॅफे किंवा तद्न्य व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही हा व्हिडीओ पहा आणि स्वतःच्या शाळेतील शिष्यवृत्ती फॉर्म स्वतःच भरा
★ ✅एक फॉर्म भरूनच पहा , 

------------------------------------
माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना नक्की शेअर करा ��

www.lmcschools.blogspot.in
8888390948

Friday, December 9, 2016

* रजा नियम *


==========================
▶महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१◀
==========================
     महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व शिक्षक व सरकारी नोकरांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.नोकरी लागल्यापासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
    महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-------------------------------------------------
      शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवाकाळात विविध प्रकारच्या रजा मिळत असतात. त्या उपभोगत असतांना सेवेत त्याचे महत्व व परिणाम आपणांस माहिती असावी तर जाणून घेऊ-

▶महाराष्ट्र नागरी सेवा(रजा)नियम-१९८१◀

                  महाराष्ट्र नागरी सेवा(रजा) नियम-१९८१ या अधिनियमात साधारणतः नियम-१ ते ९७ असून विविध रजांची सविस्तर माहिती आहे.
⏺रजाविषयक सर्वसामान्य अटी:-नियम-१० :-
------------------------------
       रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याचा कामावर गैरहजर असल्याचा परवाना. रजेचा अर्ज केल्यावर  रजा मिळेलच असे नाही. सर्वस्वी हा शासनाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.सार्वजनिक हितार्थ रजा मंजूर, नामंजूर करणे हे अधिकार शासनाचे आहेत.
⏺रजेची मंजूरी नियम-११ ते २२:-
-----------------------------------------
१)रजा मंजूर करतांना शिल्लक रजा,पूर्वी घेतलेली रजा,रजा मुदतीत व्यवस्था, प्रकार, कारण व अपेक्षिलेली रजा यांचा विचार केला जातो.
२)अनेक प्रकारच्या रजा संयुक्तपणे घेता येतील.
३)अपवादात्मक परिस्थितीत खास प्रकरणांसह पाच वर्षांपेक्षा जास्त रजा सलगपणे घेता येत नाही.
४)रजा मुदतीत अन्य नोकरी स्वीकारता येणार नाही.
⏺किरकोळ रजा:-
-------------------------
निश्चित नियमांनी उपबंधित करता येणार नाही अशा विशेष परिस्थितीत देण्यात येते.
शासकीय कर्मचारी (शिक्षकेत्तर)यांना ८ दिवस .
मुख्याध्यापक व शिक्षक यांना १२ दिवस किरकोळ रजा मिळते.
   एकावेळी सुट्टी कालावधी धरून ७ दिवसांपेक्षा जास्त घेता येणार नाही.तसेच या रजेस जोडून दीर्घ रजा घेता येणार नाही.
देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार
▶अ) सामान्य प्रकार:-
~~~~~~~~~~~~~~
१)अर्जित रजा (नि.५० ते५४)-
~~~~~~~~~~~~~~~~
-  सुट्टया मिळणाऱ्या खात्याव्यतिरिक्तच्या सेवकास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे मिळते.
-  मुख्या. व शिक्षक यांना प्रत्येक सहामाहीस ०५ दिवस मिळतात.
-  एका वेळेस १८० दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाहीत.
-  जास्तीत जास्त ३०० दिवस साठवता येते.
-  रजा पुर्ण दिवसात मंजूर करावी.
-  निलंबन काळ सहामाहीत समाविष्ट नसतो.
२)अर्धपगारी रजा(नि.६०):-
~~~~~~~~~~~~~~~
-  शासकीय सेवकास वर्षासाठी २० मिळतात.
-  वैद्यकीय अथवा खाजगी कारणासाठी मिळेल.
-  रजा साठवण्यास किंवा एका वेळी घेण्यास बंधन नाही.
-  यात वेतन ५० टक्के तर महागाई भत्ता,घरभाडे, पूरक भत्ता पूर्ण मिळतो.
३)परावर्तित रजा (नि.६१):-
~~~~~~~~~~~~~~
अर्धपगारी रजेच्या गटात तर वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही.
४)नादेय रजा किंवा अनार्जित रजा (नि.६२):-
~~~~~~~~~~~~~~
कर्मचारी परत सेवेत हजर होईल अशी खात्री पटल्यानंतर ही रजा देता येते.ही कायम कर्मचारी यांनाच मिळते.
५)असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा (नि.६३):-
~~~~~~~~~~~~~~~~~
रजा शिल्लक नसतांना विशिष्ट बाब म्हणून दिली जाते.
▶ब) खास प्रकार:-
~~~~~~~~~~~
   याबाबतचा हिशोब स्वतंत्ररित्या ठेवला जात नाही.
१)विशेष विकलांगता रजा-
~~~~~~~~~~~~~~
सेवा बजावतांना शारीरिक अथवा मानसिक विकलांगता झाल्यास-कमाल २४ महिने देय पैकी १२० अर्जित रजेप्रमाणे वेतन नंतर अर्धपगार वेतन.
२)अध्ययन रजा (नि.८० ते ९३):-
~~~~~~~~~~~~~~~
  उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमाल २८ महिने.
३)प्रसुती रजा (नि.७४):-
~~~~~~~~~~~~~
-  फक्त स्त्री कर्मचाऱ्यास देय आहे.
-  ह्यात दोन अपत्य यांना १८० दिवस याप्रमाणे मंजूर होते.
- १ वर्षापर्यंत सेवा वेतन मिळत नाही.
-  २ वर्षापर्यंत सेवा अर्धपगारी रजा मिळते.
-  या रजेला जोडून देय व अनुज्ञेय रजा घेता येते.
-  शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढविला जाणार नाही. शासन निर्णय-२५/३/३०१३
-  गर्भपात अथवा मिसक्यारेज झाल्यावर ६ आठवडे रजा मिळते.
-  मूल दत्तक घेतलेल्या महिलेस १ वर्ष किंवा मुलाचे वय १ वर्ष होईपर्यंत रजा अनुज्ञेय आहे.
४)रूग्णालयीन रजा -(नि.७७):-
~~~~~~~~~~~~~~~~
वनरक्षक, तुरूंगरक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी यांना देय
५) खलासी यांना मिळणारी रजा-(नि.७८)
▶क)सेवानिवृत्तीशी निगडीत रजा-(नि.६६):-
▶ड)रोखीत रूपांतर होणाऱ्या रजा-(नि.६८):-
शिक्षकांना लागू नाही.

▶इ) प्रासंगिक रजा