शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

शिक्षकांची कर्तव्ये

शिक्षकांची कर्तव्ये :-




  1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 
  2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 
  3. गाजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे . 
  4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे . 
  5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे . 
  6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे . 
  7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे . 
  8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे . 
  9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे . 
  10. सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे . 
  11. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे . 
  12. शालेय दैनंदिन उपक्रम , सहशालेय उपक्रम यात सक्रीय सहभाग नोंदवणे . 
  13. कृतीशील अध्ययन , ज्ञान रचनावाद , बालस्नेही , बालाकेंद्रित वातावरण , स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे . 
  14. शाळा हा गावच्या विकासाचा घटक  असल्याने साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना , संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई . योजनांची माहिती ठेऊन गरजेनुसार सक्रीय सहभाग नोंदविणे . 
  15. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे . 
  16. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे . 
  17. शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी. व्ही . ,गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे , स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड , विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी . 
  18. वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे . 
  19. मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे . 
  20. RTE ACT 2009 व RTE RULES 2011यातील सर्व तरतुदींचे पालन करणे . 

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD