रविवार, ९ जून, २०२४

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

 

1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी विहीत मुदतीत Approve/Reject करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर Request ५२ दिवसानंतर रद्द करण्यात येतील. अशा विद्यार्थ्याची शाळा नव्याने Request टाकू शकते.

 

2) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.

 

3) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल .



4) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.



5) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिण्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील .



6) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without AadhaarStudent/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. सदर विध्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन २०२३-२४ साठी promotion केले असले तरी असे विध्यार्थी आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विधार्थ्याचे आधार वैध valid करता येणार आहे, त्यामुळे Without AadhaarStudent/Invalid/Mismatch बाबत शाळांनी काम करणे योग्य राहील.



Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...