एकदा एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. पण वाट पाहुनही त्या दिवशी सावज काही मिळाले नाही.
शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्याजवळ थांबला.हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणीप्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांने जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण
उडाली.
वर अस्वल,खाली वाघ! आता काय करायचं ?
तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव
वाचविण्या
साठीच इथे आलोय."
माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखालीच बसून हे दोघे कधी खाली येतील यांची वाट पाहत होता.रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
वाघाने खूप खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण विश्वासू व ईमानदार अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. ठरल्याप्रमाणेच आता माणूस जागरण करू लागला व अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं हीच संधी साधली.तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल.
"माणसानं क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने माणसाचा स्पर्श होताच अस्वलाला जाग आली होती व चतुराईने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले. त्यामुळे ते पडलं नाही.पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.ते म्हणालं,"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस."पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."
🌸तात्पर्य ध्यानात ठेवा🌸
पाठीत खंजर खुपसून कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे,हेआपल्या हातात आहे.
ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.मानसातली माणुसकी एवढी खाली का आली ? एवढा खालच्या पातळीवर तो का आला ? पशू पेक्षाही खालच्या थराला का गेला ? याचे आत्मचिंतन होण्याची गरजआहे.अस्वलाने दिलेला शाप म्हणूनच की, काय आज माणसं चोरी करायला लागले अन् कुत्री त्याला शोधू लागली.लक्षात घ्या की, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणारया असतात, याउलट जो दुसरयाला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.