प्रजासत्ताक दिन: १० ओळींचे भाषण
१. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या देशबांधवांना माझा नमस्कार!
२. आज २६ जानेवारी, आपला प्रजासत्ताक दिन. हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.
३. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.
४. आजच्या दिवशी आपला भारत देश एक 'प्रजासत्ताक राष्ट्र' बनला आणि देशाला स्वतःची राज्यघटना मिळाली.
५. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात मोठी आणि महान लोकशाही बहाल केली.
६. प्रजासत्ताक दिन म्हणजे जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेने चालवलेले शासन होय.
७. हा दिवस आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो.
८. आजच्या दिवशी आपण त्या सर्व महान क्रांतिकारकांना आणि सैनिकांना अभिवादन करतो, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले.
९. आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की, आपण देशाचे जबाबदार नागरिक बनू आणि भारताला प्रगतीपथावर नेऊ.
१०. शेवटी मी इतकेच म्हणेन की— "विविधतेत एकता हीच आमची शान, भारत आमचा देश आणि संविधान आमचा मान."
जय हिंद, जय महाराष्ट्र!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.