प्रजासत्ताक दिन: प्रभावी भाषण
१. "ज्या भूमीवर जन्मलो आम्ही, तिचे पांग फेडूया, प्राण पणाला लावून आम्ही, तिरंगा उंच धरूया!" सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
२. आज २६ जानेवारी, आपल्या भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे.
३. आजच्या दिवशी आपल्या देशाला संविधान लाभले, ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो आणि जनतेचे राज्य सुरू झाले.
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानामुळेच आज भारतातील सामान्य माणसाला मतदानाचा आणि विकासाचा अधिकार मिळाला आहे.
५. आपला तिरंगा ध्वज आपल्याला तीन संदेश देतो: शौर्य, शांतता आणि समृद्धी. हा ध्वज सदैव उंच फडकवत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
६. केवळ भाषणे करून देशभक्ती सिद्ध होत नाही, तर आपण पाळलेले नियम आणि आपली शिस्त हीच खरी देशभक्ती आहे.
७. देशाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आपण सुशिक्षित आणि सुसंस्कारी होणे खूप गरजेचे आहे.
८. आज आपण शपथ घेऊया की, आपण आपल्या देशाला कचरामुक्त, व्यसनमुक्त आणि हिंसामुक्त करूया.
९. आपल्या देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला आणि सीमेवर लढणाऱ्या जवानाला माझे कोटी कोटी प्रणाम.
१०. भाषणाचा शेवट करताना एवढेच सांगेन— "बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!"
भारत माता की जय! इंकलाब जिंदाबाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.