शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

गणित सोपे करुन शिकविण्याची दहा सूत्रे



१) शिकविण्याचे टप्पे जितके लहान करता येतील , तेवढे लहान करावे .

२) गणितातल्या आमुर्त कल्पना शिकविताना दृश्य माध्यमांचा उपयोग आवश्य करावा.
(वस्तू हाताळायला देणे, आकृती काढणे, तक्ते वापरणे इ. )

३) मुलांच्या परिचय आसलेल्या शब्दांचा , भाषेचा वापर जास्तीतजास्त करावा.

४) एकमेकांशी संबंधित असलेले घटक एकत्रितपणे शिकवावेत.

५)नवीन संकल्पना शिकविताना शक्य तेवढ्या लहान संख्यांचा वापर करावा.

६)शाब्दिक उदाहरणांचा गणिती अर्थ कसा लावायचा हे जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे शिकवावे.
शाब्दिक उदाहरणे म्हणजे गणिताचा व्यवहारात वापरच होय.

७) सांख्यिकी उदाहरणामधल्या संख्याच आरंभीच्या शाब्दिक उदाहरणात ठेवाव्यात .

८) सर्वत्र शक्यतोवर त्याच संख्या वापराव्यात.

९)साचे किंवा आकृतिबंध तयार करुन नविन कल्पना सांगाव्यात.

१०)मुलांना स्वतःलाच कृती करण्यासाठी वाव द्यावा.

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD