बुधवार, १४ मे, २०१४

३. प्रात्यक्षिक / प्रयोग

३. प्रात्यक्षिक / प्रयोग

हेतू : -

  1. विद्यार्थ्यांना स्वतः कृती करून शिकण्याचे संधी देणे . 
  2. कृतीद्वारे संकल्पना / आशय समजून देणे . 
  3. प्रात्यक्षिक प्रयोग करण्याचे कौश्यल्य , कृतीतील क्रम, अचूकता , सफ़ाईदारपणा इत्यादी क्षमता विकसित करणे . 
  4. निरक्षण करणे, कार्य कारण संबंध शोधणे , पडताळा घेणे , निष्कर्ष काढणे , क्षमतांचा विकास करणे , इत्यादी . 
अध्ययन अनुभवासाठी प्रात्यक्षिक प्रयोगाचा विचार:-
  अभ्यासक्रमातील विषयांच्या उद्दिष्टांचा विचार करून सत्राच्या आरंभी प्रात्यक्षिक व प्रयोगाचे यादी करावी. दैनंदिन अध्यापनात आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना वैयक्तिक/ गटात प्रात्यक्षिक व प्रयोगाद्वारे कृतियुक्त अनुभव द्यावेत

दैनंदिन अध्यापनात घेतलेल्या प्रयोगाची टाचन वहीत नोंद घ्यावी . 
प्रात्यक्षिक/ प्रयोगाद्वारे मुल्यामापानाचा विचार :
  1. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक / प्रयोगाची कल्पना द्यावी . 
  2. यादीतील प्रात्यक्षिक/ प्रयोगापैकी एकच विचार मूल्यमापनासाठी करावा . 
निकष व गुनादानाचा विचार   :-
  1. मूल्यमापन करताना कृतीतील क्रम , अचूकता, गती,  सफ़ाईदारपणा , साधने हाताळण्याचे कौशल्य , निरीक्षणे व नोंदीतील अचूकता , पडताळा घेणे , निष्कर्ष काढणे इ. निकषाचा विचार करावा . 
  2. गुणदान करताना प्रत्येक निकषाचा वेगळा विचार न करता एकत्रितपणे विचार करून त्या त्या वेळेस गुणदान करावे . 
  3. मार्गदर्शिकेतील परिशिष्ट-३ मध्ये दिलेल्या नमुन्यात गुण त्याच वेळी नोंदवावेत वेगळ्या कच्च्या नोंदी करू नयेत . 
इयत्ता गात निहाय प्रात्यक्षिक / प्रयोगाचा विचार 
(नमुना उदाहरणे )
  • इयत्ता ३री व ४ थी 
  1. कार्बन डाय -औकसैडचे गुणधर्म पडताळणे (प्रयोग)
  2. उष्णतेच्या मदतीने विरघळण्याच्या  क्रीयेवरील परिणाम अभ्यासाने. 
  3. खेळ , व्यायाम , योगासने याबाबतची प्रात्याक्षिके  
  • इयत्ता ५ वी   ते ८ वी  
  1. प्रतिकृतीच्या सहाय्याने सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादी भूगोलिक घटनांचा अभ्यास करणे (प्रात्याक्षिके )
  2. योगासने, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ , काव्यात इत्यादी . (प्रात्याक्षिके )

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD