मुख्यध्यापकांची कर्तव्ये :-
प्राथमिक शाळा शिक्षण कायदा मुंबई १९४७ व नियम १९४९ यातील नियम १७ मध्ये प्राथमिक शाळा मुख्याध्यापकाची कर्तव्ये दिली आहेत ती याप्रमाणे
मुख्य शिक्षकाची कर्तव्ये :-
प्राथमिक शाळेच्या मुख्य शिक्षकाला , तो स्वतः शिकवत असलेल्या वर्गाच्या किंवा वर्गाच्या संबंधात प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून असलेल्या कर्तव्याशिवाय आणखी प्रशासन अधिकारी वेळोवेळी देईल अशा निदेशांच्या आधीनतेने.
प्राथमिक शाळा शिक्षण कायदा मुंबई १९४७ व नियम १९४९ यातील नियम १७ मध्ये प्राथमिक शाळा मुख्याध्यापकाची कर्तव्ये दिली आहेत ती याप्रमाणे
मुख्य शिक्षकाची कर्तव्ये :-
प्राथमिक शाळेच्या मुख्य शिक्षकाला , तो स्वतः शिकवत असलेल्या वर्गाच्या किंवा वर्गाच्या संबंधात प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून असलेल्या कर्तव्याशिवाय आणखी प्रशासन अधिकारी वेळोवेळी देईल अशा निदेशांच्या आधीनतेने.
- आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण यासुधा कार्यक्षम व् परिणामकारक शिक्षण देण्यास सर्वसाधारणपणे जबाबदार राहवे लागेल.
- शाळेत वक्तशीरपणे उपस्थित राहावे लागेल . शाळेच्या नेमलेल्या वेळात शाळेत उपस्थित राहावे लागेल . आपले सर्व लक्ष शाळेच्या कामाकडे केंद्रित करावे लागेल आणि शाळेच्या वेळांमध्ये कोणतेही खाजगी काम करता येणार नाही .
- शाळेच्या प्रत्येक प्रकारच्या मालमत्तेची योग्य रीतीने काळजी घेण्यात यॆइल अशी खात्रीशीर व्यवस्था करण्यास आणि शाळेची जागा स्वच्छ व निट-नेटकी ठेवण्याबद्दल जबाबदार राहावे लागेल . आशा मालमत्तेस पोहोचलेल्या वृत्त मुख्याध्यापकाने प्रशासन अधिकाऱ्यास किंवा गाव किंवा नगरपालिका शाळा समितीला कळवावे . प्रशासन अधिकार्याने तसा अधिकार दिल्यास त्याने शाळेच्या इमारतीच्या दुरुस्त्या कराव्यात आणि त्या कारणासाठी केलेल्या खर्चाचा योग्य तो हिशोब ठेवावा
- विध्यार्थांची त्यांच्या वर्गामध्ये व्यवस्था करणे व वर्षभरातील त्यांची प्रगती व वार्षिक परीक्षांचे निकाल यांना अनुसरून वरच्या वर्गात घालणे याबाबतीत जबाबदार राहावे लागेल . .
- शाळेच्या परिसरातील ६-१४ वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करून त्यांना नियमित हजर राहण्यास प्रवृत करावे .
- शाळेत हजर न राहणाऱ्या मुलांच्या पालकांना भेटून त्यांच्या अनियमित उपस्थितीच्या कारणांची चौकशी करून त्यांच्या मुलांना शाळेत नियमितपणे हजर राहण्यास भाग पाडण्याबद्दल त्यांची मने वळवून आपल्या शाळेतील हजेरीचे प्रमाण वाढविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करावे लागतील .
- चालू व अद्यावत शिरगणती नोंदवही ठेवण्यास जबाबदार राहावे लागेल .
- उपस्थिती -नोटीसा देण्याबाबत जबाबदार राहावे लागेल
- शालेय वर्ष सुरु झाल्यापासून दोन महिन्याच्या आत शाळेत जाण्याची सक्ती असलेल्या सर्व मुलांची नावे पाटावर दाखल करून घेण्यास जबाबदार राहावे लागेल.
- शाळांना भेट देण्याबाबत आणि शाळेत नाव न घातलेल्या किंवा नियमितपणे हजार न राहणाऱ्या किंवा सातत्याने गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या घरी भेट देण्यास जबाबदार राहावे लागेल.
- आवश्यक ते अधिकार त्यांच्याकडे सोपवण्यात आले असतील तर ताकीद व हजार राहण्याबाबतचे आदेश देण्यास जबाबदार राहावे लागेल.
- खटले भरण्यासाठी प्रकरणे तयार करून आणि प्रशासन अधिकाऱ्याने याबाबत प्राधिकार दिला असल्यास दंड-अधिकाऱ्याकडे किंवा गावच्या न्यायपिठाकडे किंवा जिल्हा दंड-अधिकाऱ्याने याबाबत अधिकार दिलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे तक्रारी नोंद्वुन मुलांना हजर राहण्यची सक्ती करण्यास जबाबदार राहावे लागेल.
- प्रशासन अधिकारी किंवा सहाय्यक प्रशासन अधिकारी त्यांच्याकडे वेळोवेळी नेमून देईल असे तपासणीचे व देखरेखीचे काम धरून इतर काम करण्यास जबाबदार राहावे लागेल.
- शाळेची फी व दंडाची रक्कम व शाळेला मिळालेला इतर पैसा गोळा करण्यास व तो तालुका शिक्षकाकडे पाठविण्यात येइपर्यंत सुरक्षितपणे ताब्यात ठेवण्यास जबाबदार राहावे लागेल.
- शाळेची पगार बिले तयार करावी लागतील आणि प्रशासन अधिकारी याबाबत विनिर्धिष्ट करील अशा तारखेपूर्वी ती तालुका शिक्षकाकडे पाठवावी लागतील . (अथवा शालार्थ प्रणालीद्वारे बिले ऑन-लाईन DDO २ ला सादर करावीत . )
- तालुका शिक्षकाकडून असा पगार मिळाल्यावर आपल्या सहाय्यकांना ताबडतोब त्याचे वाटप करण्यास जबाबदार राहावे लागेल.
- विद्यार्थ्याने किंवा त्याच्या पालकाने अर्ज केल्यानंतर आणि कोणतीही फी विहित केली असल्यास ती फी भरल्यानंतर सर्वसाधारण नोंदवहीतून शाळा सोडल्याचे दाखले किंवा उतारे द्यावे लागतील .
- दरवर्षी शाळेचे वेळापत्रक तयार करावे लागेल .
- शाळेच्या सर्व नोंदवह्या व दप्तर योग्य तऱ्हेने राखण्यास जबाबदार राहावे लागेल.
- खेळ व क्रीडा धरून शाळेचे एकंदर कार्यक्रम आयोजित करणे , वार्षिक किंवा नियतकालिक परीक्षा घेणे ,अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कार्यक्रम पार पाडणे आणि शाळेतील मुलांना पुस्तके, पाट्या, शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, शालेय पोषण आहार किंवा गणवेषाचे वाटप करणे या गोष्टीची जबाबदारी पार पाडावी लागेल
- आपल्या अखत्याराखालील शाळेचा सर्व पत्रव्यवहार करावा लागेल .
- आपल्या सहाय्यकांच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवावे लागेल आणि त्यात समन्वय साधावा लागेल. त्यांची कार्यक्षमता आणि शिस्त याबद्दल जबाबदार राहावे लागेल.आणि आपल्या सहयाकांपैकी कोणीही गैरवर्तणूक किंवा शिस्तभंग केल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यास ती प्रकरणे सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यामार्फत ताबडतोब प्रशासन अधिकाऱ्यास कळवावे लागतील .
- आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर स्वच्छता व टापटीप यांच्या सवयींचे महत्व बिंबवावे लागेल , आणि त्यांची वर्तणूक व शिस्त यास जबाबदार राहावे लागेल.
- आपल्या शाळेतील विद्यार्थांमध्ये जातीय सलोखा आणि सदभावना वाढीस लावून , कोणत्याही विद्यार्थ्याला तो अमुक एका जातीचा किंवा जमातीचा म्हणून कोणत्याही प्रकारे अपात्र ठरवले जाणार नाही अशी खात्रीशीर तजवीज करावी लागेल .
- कोणत्याही राजकीय किंवा जातीय संघटनेत प्रत्यक्ष भाग घेण्यापासून किंवा जिल्हा शाळा मंडळाच्या अथवा प्राधिकृत नगरपालिकेच्या क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीसाठी कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने प्रचार करण्यापासून दूर रहावे लागेल .
- शिक्षकांच्या व इतर कर्मचारी यांच्या कोणत्याही संघाला किंवा संघटनेला शासनाने मान्यता दिली नसेल तर त्या संस्थेचे किंवा संघटनेचे सदस्यत्व स्वीकारता येणार नाही , किंवा अशा कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेता येणार नाही .
- प्रशासन अधिकारी त्यास सांगेल अशी प्राथमिक शिक्षणा-संबंधीची इतर कर्तव्य पार पाडावी लागतील आणि तो अधिकारी शिक्षणा-संबंधी त्यास जे निदेश देईल त्याचे पालन करावे लागेल .
प्राथमिक शाळा संहिता pdf टाकावी.
उत्तर द्याहटवा