संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, १४ मे, २०१४

२ . तोंडी काम

२ . तोंडी काम :-

  • हेतू :-
  1. बोलणे/संभाषण विकसित करणे 
  2. वाचन कौश्यल्य विकसित करणे 
  3. तोंडी हिशोब पडताळणी 
शासन निर्णयात सुचवलेले पर्याय
(प्रश्नोत्तरे , प्रकट वाचन , भाषण संभाषण , भूमिकाभिनय , मुलाखत , व गटचर्चा )

  • तोंडी कामाची कार्यपध्दती :-
पूर्वतयारी :-
विषयनिहाय इयत्ता निहाय समान काठीण्य स्तर असलेल्या प्रश्नपेढ्या व प्रकट वाचनासाठी समांतर उतारे /परिच्छेद /वाचनपाठ तयार ठेवणे .

तोंडीकाम  प्रध्याण्याने कोणते व कसे याचा विचार :-
पाठ्यान्शाच्या स्वरूपानुसार तोंडी कामाच्या पर्यायाचा/माध्यमाचा विचार करावा .
जसे भाषा विषय - उतारा, गोस्त, परिच्छेद प्रकट वाचनासाठी
विषयसूची-भाषण संभाषणासाठी , चित्रे व मजकूर प्रश्नोत्तरांसाठी .

गणित :- संख्यांचे वाचन , उदाहरणांचे वाचन आकृत्यांचे वाचन , मापानाशी संबंधित बाबी , पाढे , सूत्रे , आलेख या संबंधाने बोलणे , हिशोब, तोंडी हिशोब करणे  इत्यादी .

विज्ञान, भूगोल :-
आकृत्या नकाशे, आलेख इत्यादींचे वाचन प्रश्नोत्तरे .

वर्गात घातलेल्या तोंदिकामाचा दैनंदिन टाचणात उल्लेख करावा 
मूल्यमापन कसे ? 
  • गटात/ वैयक्तिक स्वरुपात घ्यावे . 
  • तोंडी कामासाठी निवडलेले पर्यायी साधन वापरून सत्रातील एखाद्या आठवड्यात दररोज काही विद्यार्थ्यांचे या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन घ्यावे . 
  • तोंडी कामासाठीचा पाठ्यांश , पर्याय व कालखंड या संबंधाने विद्यार्थ्यांना पूर्व सूचना द्यावी 
  • तोंदिकामाचे मिळालेले गुण ज्या त्या वेळी गुनानोंद्पात्रकत नोंदवावे . (मार्ग्दर्शिकेतील नमुन्यात) अन्य तक्त्याचा वापर करू नये 
  • निश्चित केलेल्या निकषांचा एकत्रित विचार करून गुणदान करावे . 
तोंडीकामातून मूल्यमापन (निकषांचा व गुणदानाचा विचार  )
तोंडी कामासाठी प्रकाट वाचन  प्रश्नोत्तरे तोंडी हिशोब हे पर्याय मूल्यमापनासाठी प्रामुख्याने वापरावेत 
इतर पर्याय ऐच्छिक राहतील . 

तोंदिकाम समृद्धीसाठी अन्य काही पर्याय :-
  • सप्ताहातील एखादा दिवस वाचंदिन 
  • परिपाठातून कथा, बातम्या , सुविचार, गोष्ट सांगणे . 
  • प्रश्नमंजुषा , सामान्य ज्ञानाचे प्रश्न तसेच विषयज्ञानासंबंधी प्रश्नोत्तरे 
  • प्रसंगानुसार विषय देऊन बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे .  



Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...