संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

सर्व शिक्षा अभियान

6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. 

1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे. 

शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात. 

या कार्यक्रमांतर्गत पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. 
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एका निश्चित मुदतीची चौकटदेशभरात दर्जेदार शिक्षणाच्या गरजेला प्रतिसादमुलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याची संधीशालेय शिक्षण व्यवस्थापनात पंचायती राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघटना, माता-शिक्षक संघटना, जमातींच्या स्वायत्त परिषदा यांना प्रभावीरित्या सहभागी करून घेण्याचा एक प्रयत्न.उच्च स्तरावर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीचे सक्रीय राजकीय पाऊलकेंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनामध्ये चांगली भागीदारी.राज्यांना प्राथमिक शिक्षणासंदर्भात स्वतंत्र दृष्टी विकसीत करण्याची संधी.

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

स्वत:चा ब्लॉग / वेबसाइट बनवा मोफत ......

   नमस्कार मित्रांनो ,
       आपणास कळविण्यात आनंद होतो की आता स्वतःची वेबसाईट / ब्लॉग बनविणे खूप सोपे झाले आहे .
तुम्हाला त्यासाठी कोणत्याही SOFTWARE ची आथवा विशेष तंत्राची गरज राहिली नाही , तुमच्याकडे संगणकाचे जुजबी ज्ञान असले किंवा तुमचे वय कितीही असले तरी आपण काही मिनिटांमध्ये आपली स्वतःची वेबसाईट / ब्लॉग  बनवू शकता .
आपल्या माहितीस्तव फोटोंच्या  आधारे वेबसाईट / ब्लॉग वानाविण्याचे टप्पे दिले आहेत
या टप्प्यांनुसार आपण एक छान वेबसाईट / ब्लॉग बनवू शकता . 


  1. आपल्या वेब ब्राउजरवर blogger.com  असे शोधा      




२.   blogger च्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे google account चे लॉग इन दिसेल तिथे लॉग इन करा , जर आपले google खाते नसेल तर ते काढून घ्या . नंतर लॉग इन करा . 


३. लॉग इन केल्यानंतर खालील कृती करा. 


४. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे template ची निवड करा . 



५. आता तुम्ही तुमच्या ब्लॉगवर  स्वरूप निश्चित केले आहे , आपले लेखन किंवा पोस्ट  लिहिण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे कृती करा . 





६. आता तुम्ही ब्लॉग  लिहिण्यासाठी तयार आहात यात खाली दाखवल्याप्रमाणे आपण आपले आवडीचे लेख , कविता , फोटो , व्हिडिओ , पोस्ट करू शकता . 



७. वरीलप्रमाणे कृती केल्यानंतर आपला प्राथमिक स्वरूपातील ब्लॉग तयार होईल .
तो खालीलप्रमाणे दिसेल . 


 तुमच्या ब्लॉगला अधिक effect देण्यासाठी किवा अधिक माहितीसाठी , आपले प्रश्न comment box मध्ये विचारा 

किंवा संपर्क करा  मो. नं . ८८८८३९०९४८       whatsapp नं ८८८८३९०९४८ई -मेल :- lmcschools@gmail.com 



शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

गणित सोपे करुन शिकविण्याची दहा सूत्रे



१) शिकविण्याचे टप्पे जितके लहान करता येतील , तेवढे लहान करावे .

२) गणितातल्या आमुर्त कल्पना शिकविताना दृश्य माध्यमांचा उपयोग आवश्य करावा.
(वस्तू हाताळायला देणे, आकृती काढणे, तक्ते वापरणे इ. )

३) मुलांच्या परिचय आसलेल्या शब्दांचा , भाषेचा वापर जास्तीतजास्त करावा.

४) एकमेकांशी संबंधित असलेले घटक एकत्रितपणे शिकवावेत.

५)नवीन संकल्पना शिकविताना शक्य तेवढ्या लहान संख्यांचा वापर करावा.

६)शाब्दिक उदाहरणांचा गणिती अर्थ कसा लावायचा हे जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे शिकवावे.
शाब्दिक उदाहरणे म्हणजे गणिताचा व्यवहारात वापरच होय.

७) सांख्यिकी उदाहरणामधल्या संख्याच आरंभीच्या शाब्दिक उदाहरणात ठेवाव्यात .

८) सर्वत्र शक्यतोवर त्याच संख्या वापराव्यात.

९)साचे किंवा आकृतिबंध तयार करुन नविन कल्पना सांगाव्यात.

१०)मुलांना स्वतःलाच कृती करण्यासाठी वाव द्यावा.

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण

ई-लर्निंगकडे वाटचाल

   आमच्या शाळांमध्ये ई-लर्निंगची प्रभावी आम्मलबजावणी व्हावी यासाठी आमच्या प्रयत्नांमुळे व मा. आयुक्त साहेब आणि मा.शिक्षणाधिकारी साहेब यांच्या पुढाकारामुळे शाळांमधील आतिरीक्त संगणक गरजु शाळांना हस्तांतरीत करण्यात आले. यामुळे आमच्या १० शाळांमध्ये ई-लरनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. 

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे



 आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले  अभारी  अहोत , वरील फॉर्म मधील महिती google docs वर संकलित झाली असुन आपल्याला पहाण्यासाठी  पुढील लिंकवर प्रसिद्ध करण्यात  आलेली आहे . माहिती पहाण्यासठी लिंकवर क्लिक करा  https://docs.google.com/spreadsheets/d/14g2dphpItQcpMmf12GABkP24nIzkaUeeXxyTkL67fXY/pubhtml

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...