संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

सौ धनश्री देसाई( तोड़ेवाले) यांनी मांडलेले सुंदर काव्य:

"आज देवाला सुट्टी आहे
कृपया मंदिरात जाऊ नये,
देव खुप बिझी आहे
त्याला साकडं घालू नये।

जायचंच असेल तर जा एका अनाथाश्रमात,
तो तिथे लहान पोरांना हसवीत आहे,
तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला.
देवाला आज सुट्टी आहे।

तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात,
प्रेमाने रोग्याला बरा करताना
तुम्ही जा आणि हातभार लावा
मात्र आपली तक्रार सांगू नका कारण आज देवालाही सुट्टी आहे।

तो दिसेल वृद्धाश्रमात आजी
आजोबांचे डोळे पुसताना,
रुमाल घेवून जा तुम्हीही अश्रु पुसण्यासाठी
मात्र आपले अश्रु दाखवु नका कारण आज देवाला सुट्टी आहे।

तो बसला आहे ट्रॅफिक सिग्नल वर खेळणी विकणा-या मुलांच्या सुरक्षेसाठी
तुम्ही जा....हातात वह्या पुस्तके देऊन त्यांना सुशिक्षित करा
उगीच पाखंड पुराणासाठी मंदिरातही जा हवंतर
पण आज देवाला सुट्टी आहे।

तो बसला आहे अन्नाच्या कणात,
उगीच अन्न वाया घालू नका,
जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला,
तो आज त्यांच्यात रमला आहे ।

उगीच मंदिरात जाऊन देवाचा वेळ घालवू नका त्याला भरपूर कामं आहेत,
जमलंच तर काही समाजकार्य करा.
आज देवाला सुट्टी आहे.....������

1 टिप्पणी:

  1. पुळकुटे सर आपल्या मेहनतीला सलाम, सुंदर वेबसाईट बनवली आहे आणि माझ्या कवितेला स्थान दिल्याबद्दल आपले आभार व्यक्त करते.

    सौं धनश्री संकेत देसाई

    उत्तर द्याहटवा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...