भात नको गुरूजी मले ग्यान पायज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भात नको गुरूजी मले ग्यान पायज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २० डिसेंबर, २०१५

भात नको गुरूजी मले ग्यान पायज

��भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे,
माह्याकडं गुरूजी तुमचं
ध्यान पायजे.....��

��बाप म्हणे मले
तुले खायाले कमी नाय,
सांग गुरूजीले द्याया
जे मह्याकडं नाय,
मह्या हुशारीले जगी
स्थान पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे........��

��कागदांमंदी झुकलेली तुमची
वर मान पायजे,
इतिहास शिकवाले आमाले
तुमच्यात 'जान' पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे............��

⭕साळंत नाय त्याची
तुमा मोप चिंता,
मह्या भविष्याची
काहून रचते चिता ?
माह्यासाठी रडणारं तुमचं
मन पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे.....⭕

⭐डोक्यामंदी सादील खर्च
Income Tax चा मार्च,
तुमा  साळंत सोधाया
पायजे मले torch,
तुमच्यागत आमाले बी थोडा
मान पायजे
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे........⭐

��रंग्या साळंमंदी नाय
तरी बी वरच्या यत्तेत जाय,
कोरी पाटी घेऊन कुणी
बालीस्टर होणार नाय,
कागदावर नको मह्यात
गुण पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे,
मह्याकडं गुरूजी तुमचं
ध्यान पायजे......

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...