भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे,
माह्याकडं गुरूजी तुमचं
ध्यान पायजे.....
बाप म्हणे मले
तुले खायाले कमी नाय,
सांग गुरूजीले द्याया
जे मह्याकडं नाय,
मह्या हुशारीले जगी
स्थान पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे........
कागदांमंदी झुकलेली तुमची
वर मान पायजे,
इतिहास शिकवाले आमाले
तुमच्यात 'जान' पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे............
⭕साळंत नाय त्याची
तुमा मोप चिंता,
मह्या भविष्याची
काहून रचते चिता ?
माह्यासाठी रडणारं तुमचं
मन पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे.....⭕
⭐डोक्यामंदी सादील खर्च
Income Tax चा मार्च,
तुमा साळंत सोधाया
पायजे मले torch,
तुमच्यागत आमाले बी थोडा
मान पायजे
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे........⭐
रंग्या साळंमंदी नाय
तरी बी वरच्या यत्तेत जाय,
कोरी पाटी घेऊन कुणी
बालीस्टर होणार नाय,
कागदावर नको मह्यात
गुण पायजे,
भात नको गुरूजी मले
ग्यान पायजे,
मह्याकडं गुरूजी तुमचं
ध्यान पायजे......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.