बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. १३


✳  खड्यातुन संख्या शिकणे.

             या उपक्रमामध्ये केवळ ९ खड्यांतून मुले एक अंकी संख्या , १८ खड्यांतून दोन अंकी संख्या , २७ खड्यांतून तीन अंकी संख्या तसेच ३६ खड्यांतून चार अंकी संख्या लिहितात व वाचतात. याप्रमाणेच कृती केल्यास मुले कोटी पर्यतच्या संख्या वाचन व लेखन करतात.

✳ कार्यपद्धती :

एकक साठी खड़े रंग - काळा
दशक साठी खड़े रंग - पांढरा
शतक साठी खड़े रंग - पिवळा
हजार साठी खड़े रंग - हिरवा
          यापद्धतीने खड्याना रंग देऊन घेणे. वर्गात साधारण १५ ते २०सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ रेखाटून घेणे. आता एका मुलाला ठराविक अंतरावरून केवळ काळे ९ व पांढरे ९ खड़े वर्तुळात टाकण्यास सांगावे. वर्तुळात पडलेले खड़े केवळ विचारात घ्यावेत व वर्तुळाबाहेरील खड़े बाजूला ठेऊन द्यावेत. वर्तुळात पडलेल्या खड्यांपैकी प्रथम पांढरे खड़े मोजावेत व नंतर काळे खड़े मोजावेत.
       उदाहरणार्थ :
     गोलात १८ खड्यांपैकी ६ काळे खड़े व ७ पांढरे खड़े पडले. यात प्रथम पांढरे खड़े मोजावेत , डायरेक्ट ७ असे न मोजता १०,२०,३०,......,७० असे मोजावेत. व नंतर काळे खड़े मोजताना मोजलेले पांढरे खड़े सत्तर आणि काळा खड़ा एक ७१ व पुढे ७२,७३,७४,७५,७६ असे मोजावेत.
          यापद्धतीने ९९ पर्यन्तच्या संख्या पहिलीचे मुले १५ दिवसात तयार करु शकतात. याप्रमाणेच २७ खड़े घेऊन ९९९ पर्यंतच्या संख्या तर ३६ खड़े घेऊन ९९९९ पर्यंतच्या संख्या पहिलीचे मुले देखील तयार करतात. पुढे वेगळ्या रंगाचे खड़े वापरून हजारच्या पुढील संख्याही तयार करता येतात.

✳ या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य होतात :

१) मुर्त वस्तु संबोधाकडुन मुले संख्या संबोधा कडे जातात.
२) गोलात खडे टाकताना मुले आनंदायी पध्दतीने संख्या शिकतात .
३) घोकम पट्टी शिवाय संख्याचे दृढीकरण होते .
४) लहान वयोगटासही संख्या पटकन समजण्यास मदत होते.
५) एकक ,दशक, शतक ,हजार हे स्थानिक संबोध समजतात.

         या उपक्रमाचा सराव घेतल्यानंतर इ .३री च्या वर्गात मला आलेला अनुभव असा की, जी मुले संख्यावाचनात चुका करत होती , पाठीमागे होती ती मुले अतिशय आनंदाने व दडपणाशिवाय संख्या वाचन व लेखन करू लागली .
अगदी  पहिलीच्या वर्गास याच पध्दतीने सराव दिल्यानंतर ती मुले देखील ३ अंकी संख्या लवकरात लवकर वाचायला लागली. कुमठे बीटातील राकुसलेवाडी शाळेतील शिक्षक श्री .सुतार सर यांच्या कल्पनेतून कृतीत आलेला हा गणिती संख्या खेळ सर्वांना नक्कीच आवडेल.
          धन्यवाद!!!

                   गौरी पाटील
          उपशिक्षिका - चांदोरी मुले,
          ता.- निफाड, जि. नाशिक.

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD