नमस्कार मित्रानो,
दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक इयत्ता चौथी पाठयक्रमात आहे. तोच घटक आनंददायी पद्धतीने घेता येतो. या घटकाच्या सरावाबरोबर वजाबाकीचा देखील सराव यातून घेता येतो.हे सर्व थोर भारतीय गणित तज्ञ श्री.काप्रेकर यांचा स्थिरांक 6174 मुळे... काप्रेकरांनी हे इ.स.1949 मध्ये शोधून काढलं.यालाच 'काप्रेकारांचा स्थिरांक 1949' म्हणून ओळखलं जातो.
यांच्याविषयी वाचलं आणि याचा आज चौथी वर्गात वापर केला.खूप छान प्रतिसाद मिळाला.
चला तर मग जाणून घेऊया..
'काप्रेकर स्थिरांक-6174 '
====================
प्रथम अशी चार अंकी संख्या निवडा, की त्यातील अंक सारखे नसतील म्हणजे (1111 किंवा 2222 नसतील अशी.
त्या संख्येतील अंकांपासून मोठयात मोठी व लहानात लहान संख्या बनवून त्याची वजाबाकी करा.
त्याचे जे उत्तर येईल त्यापासून परत ही कृती करा.आणि असे परत परत करत राहा.
काही स्टेप ओलांडल्यानंतर दरवेळी उत्तर 6174 च येते.
प्रत्यक्ष उदाहरण पाहूत.
आपण 2013 ही संख्या घेऊ.
त्यापासून मोठयात मोठी- 3210
लहानात लहान - 0123
याची वजाबाकी
3210 - 0123= 3087
आलेल्या उत्तरापासून परत वरील प्रमाणेच कृती करुत.
8703 - 0378 = 8352
8532 -2358 = 6174
7641 - 1467 = 6174
अशाप्रकारे परत परत तीच संख्या येते. 6174 हा काप्रेकरांच्या क्रियेचा गाभा आहे आणि हेच त्याचे वैशिष्ट्य देखील...
याचे फायदे पाहूत.
१) लहान मोठी संख्या सरावासाठी मनोरंजक पद्धती.
२)मुलं आवडीने संख्या बनवतात व उदाहरणे सोडवतात.
३)जलद गणिती उदाहरण सोडविण्याची स्पर्धा निर्माण होते.
Try it amazing..
धन्यवाद..!
संकलन
उमेश कोटलवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.