गुरुवार, २ एप्रिल, २०१५

देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना

देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना 
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना 

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना 
वेदना जाणावयाला जागवू संवेदना 
दुर्बळाच्या रक्षणाला पौरुषाची साधना 

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना 
सुन्द्रचा वेध लागो, मानवाच्या जीवना 
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता सशोधना 

भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना 
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना 
मुक्त आम्ही फक्त मानू बधुतेच्या बंधना 

Popular Posts

शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन

 शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...