संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

खेडे असो किंवा शहर, आई वडिल आणि मुलगा ही तीनही जण टीव्हीच्या समोर बसून टीव्ही पाहात आहेत, हे चित्र अगदी सर्रास दिसून येते आहे. मुलांनी त्रास देऊ नये, पटकन जेऊन टाकावे म्हणून सुरुवातीला टीव्हीसमोर बसून जेवण्याचे आमिष दाखविले जाते. पण नंतर मात्र, ही गोष्ट सवयीमध्ये कधी बदलते याचा पत्ता लागत नाही. कार्टुन चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक कार्टुनमध्ये दाखविण्यात येणारा हिंसाचार मुलांच्या वागण्यातही दिसायला लागतो. भीमासारखा लाडू खाल्ला की दुसऱ्याला ठोसा मारायची शक्ती येते, इतकीच गोष्ट मुलांच्या लक्षात राहते. त्यामागचा विचार मुलांना समजण्याइतकी मुले मोठी नसतात. टीव्ही अती पाहण्यामुळे मुलांचा अभ्यास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील टीव्हीचे व्यसन कमी व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. 

वेळावर नियंत्रण - मुलांनी टिव्ही पाहूच नये अशी सक्ती केल्यास मुले टिव्ही पाहणे सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी टिव्ही किती वेळ पाहावा यावर पालकांचा कंट्रोल असायलाच हवा. पालक जो कार्यक्रम पाहतील, तो कार्यक्रम साहजिकपणे मुलेही तोच कार्यक्रम पाहतात. त्यामुळे स्वतः पालकांनीच टिव्ही पाहण्याच्या वेळावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ठराविक वेळ झाल्यावर टिव्ही बंद करण्याची सवय मुलांना लावण्याचा प्रयत्न करावा.  मुलांसाठी वेळ द्या – अनेकदा पालकांना वेळ नाही म्हणून टिव्ही लावण्यात येतो. ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. मुलांसाठी तुमचा दिवसामधला काही वेळ राखून ठेवा. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याशी बोला. त्यामुळे मुलांशी संवाद साधला जाईल. जेवताना टिव्ही नकोच – टिव्हीसमोर बसून जेवण्याने अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जेवताना टिव्ही नकोच.  अवांतर वाचन आणि खेळ – संध्याकाळी अनेक ठिकाणी मुलांसाठी खेळ आणि व्यायाम घेतला जातो. अशा एखाद्या मैदानावर नाव नोंदविल्यास, टिव्ही पाहण्याचा वेळ आपोआप कमी होतो. त्याचप्रमाणे रोजचा वर्तमानपत्र वाचणे, छोटी गोष्टींची पुस्तके वाचणे या गोष्टी सुरू केल्यास, टिव्ही पाहणे आपोआप कमी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...