आपणास परिपाठासाठी ३०मिनीटे वेळ असल्याने पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
1}सावधान- विश्राम आदेश
संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
2} राष्ट्रगीत
सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद्वारे राष्ट्रगीत घ्यावे.
3}प्रतिज्ञा
आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.
उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)
4} भारताचे संविधान
परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.
5} प्रार्थना व श्लोक
ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.
6} आजचा दिवस
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.
7} सुविचार
सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
8} दिनविशेष
चला जाणून घेऊया, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे-----.(विद्यार्थ्याचे नाव)
9}आजची म्हण व वाक्यप्रचार-
कमी श्ब्दात जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण घेऊन येत आहे----(विद्यार्थ्याचे नाव)
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह
सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित
विद्यार्थ्यांना द्यावी.
10}बातमीपत्र-
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते अशाच आजच्या बातम्या घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
11} समूहगीत/देशभक्तीपर गीत-
आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे. Mp3 फॉरमँटमधील गीते खाली दिलेल्या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
12} बोधकथा
आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे. सुंदर व वाचनीय बोधकथा खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
13} प्रश्नमंजुषा
आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल
त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)
14 } वैज्ञानिक दृष्टिकोन-
समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)
15} इंग्रजी शब्दार्थ
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
16} दिनांक तो पाढे-
आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
17} आजचे वाढदिवस
स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खिस असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या
विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
18 } पसायदान
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.
19 }मौन
२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
20} विसर्जन
विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.