संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, १४ मे, २०१४

१. दैनंदिन निरीक्षण

१. दैनंदिन निरीक्षण :
हेतू :- 
  1. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा व सुप्त गुणांचा मागोआ घेणे 
  2. शिकताना विद्यार्थ्यांनी वर्गात केलेली कृती किंवा दिलेला प्रतिसाद तसेच त्याचे वर्गाबाहेरील वर्तन याचे हेतुपूर्ण निरीक्षण करणे . 
  3. दैनंदिन अध्ययन प्रक्रियेच्या निरीक्षणातून शिक्न्यातले अडथळे दूर करणे . 
  4. विद्यार्थ्यांमध्ये असलेली शक्तीस्थळे/सामार्थ्यास्थळे शोधणे व त्याच्या विकासासाठी विशेष मार्गदर्शनाचे नियोजन करणे . 
  5. व्यक्तिमत्व विकसनाचा आढावा घेणे (मुल्य , गाभाघटक , जिवनकौशल्य , काळ,आवड, छंद व गुण वैशिष्ट्ये . 
कार्यपद्धती :-
  • विद्यार्थ्यांच्या शिकण्याकडे डोळसपणे लक्ष्य द्यावे . त्याचे शिकणे व वागणे यांचे जाणीवपूर्वक निरीक्षण करावे. 
  • चांगल्या बाबींचे कौतुक करावे , प्रोत्साहन द्यावे अडथळे उणीवा , वेळच्या वेळी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करावा . 
  • नोंदीचा मुलाच्या संवेदनशील मनावर परिणाम होऊ नाहे याची काळजी घ्यावी . त्या दृष्टीने सकारात्मक नोंदी कराव्यात . 
नमुने उदाहरणे :-
    • त्रुटी /उणीवा /अडथळे/या संबंधाने 
    भाषा :- 
    • वाचताना अक्षरे/ शब्द वगळतो /वगळते . 
    • क्रम बदलून वाचताना अडखळतो / अडखळते . 
    • श्रुतलेखानात 'र ' च्या जोडाक्षारांमध्ये गोंधळतो /गोंधळते . 
    गणित :-
    • क्रमाने संख्या वाचताना संख्या गाळतो / गाळते . 
    • संख्यांचे श्रुतलेखन करताना अंकांची अदलाबदल होते . 
    परिसर अभ्यास / सामान्य विज्ञान :
    • स्वच्छताविषयक सवयींकडे लक्ष देणे आवश्यक . 
    वैशिष्ट्यपूर्ण नोंदी :__
    भाषा :-
    • बोलताना म्हणी , वाक्प्रचारांचा चपलखपणे वापर करतो /करते 
    • पाठ्यापुस्ताकाशिवाय इतर पुस्तके वाचतो /वाचते . 
    • दिलेला विषय वेगळेपणाने लिहितो / लिहिते . 
    • स्वतःचे म्हणणे प्रभावीपणे मांडतो /मांडते . 
    गणित :-
    • उदाहरणे गतीने सोडवतो/सोडविते 
    • उदाहरणे सोडविताना नवीन रीत वापरतो/वापरते . 
    • संख्यांवर प्रभुत्व आहे . 
    • परिणामांवर आधारित उदाहरणे गतीने सोडवितो/सोडविते . 
    • गणिती कोडी सोडविण्यात रुची दाखवितो / दाखविते 
    विज्ञान :-
    • प्रयोग सफाईदारपणे  करतो/करते .
    • प्रत्येक काम करताना शास्त्रीय बाबी पडताळून काम पूर्ण करतो . 
    • दैनंदिन कामातून पर्यावरण, स्वच्छता या बाबींकडे कटाक्षाने लक्ष देतो . 
    कला /कार्यानुभव/शारीरिक शिक्षण :-
    • प्रात्याक्षिके  सफाईदारपणे करतो/करते . 
    • नाविन्यपूर्ण रचना, मांडणी करतो/करते . 
    • गतीने व अचूकपणे काम पूर्ण करतो/करते . 
    • श्रमाचे कोणतेही काम करताना लाजत नाही . 
    भूगोल :-
    • नकाशावाचन अचूक करतो/करते . 
    • खगोलीय माहिती आवडीने जमवतो . 
    नागरिक शास्त्र :-
    • सुरक्षिततेचे नियम पाळतो/पळते 
    • बिबिध संस्थांची माहिती मिळवतो ,रचना समजून घेतो/घेते 
    • लोकशाही मुल्यांचा आदर करतो / करते 
    • राष्ट्रीय मुल्यांचा  आदर करतो /करते . 
    • राष्ट्रीय संपत्तीची जपणूक करतो . 
    • राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करतो . 
    • सुरक्षिततेची खबरदारी घेतो . 
    इतिहास :-
    • महापुरुषांची चरित्रे वाचतो . 
    • गावाच्या इतिहासाबद्दल कुतूहल आहे . 
    इतर (व्यक्तिमत्व विकासानासंदर्भात नोंदी ):-
    • मित्रांशी प्रेमाने वागतो . त्यांना मदत करतो/करते . 
    • वडीलधार्या व्यक्तींशी आदबीने वागतो/वागते 
    • परिसरातील घडामोडी संबंधाने भरभरून बोलतो /बोलते . 
    • खेळताना सांघिक भावना दिसून येते . 
    • शिकताना का? कसे ? असे प्रश्न खूप विचारतो/विचारते 
    • इतरांच्या मतांचा आदर करतो /करते . 
    • आपले म्हणणे नेमके व कल्पकतेने मांडतो /मांडते . 

    Popular Posts

    Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

      1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...