संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, ९ मार्च, २०१५

वाढत चाललेल्या स्वाइन फ्लूचा धोका टाळण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय

स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य नागरिकांबरोबरच सरकारलाही त्रस्त करून सोडले आहे. अत्यंत प्राणघातक अशा हा आजार असल्याने त्याची लागण होऊ नये म्हणून लोक अनेक प्रकारच्या औषधींचे सेवन करतात. सरकारही त्यांच्या पातळीवर सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. पण काही अत्यंत सोपे असे घरगुती औषधांचा वापर करून उपाय केल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो. या उपायांमुळे  स्वाइन फ्लूच्या विषाणूची लागण होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.

 

तुळस

तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते. तसेच त्याच अँटि बॅक्टेरियल, अँटि फंगल तत्वदेखिल असतात. त्यामुळे तुळशीची पाच स्वच्छ धुतलेली पाने रोज चावून खाल्ल्यास घशाचे इन्फेक्शन होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.

आवळा
 
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सीयुक्त तत्वे असतात. त्यामुळे तेही स्वाइन फ्लुचा सामना करण्यात अधिक फायदेशीर ठरू शकतात. बाजारात दररोज आवळा मिळतो असे नाही. पण तसे असले तरी आवळा ज्यूस खरेदी करण्याचा पर्याय आपल्याकडे असतो.

कोरफड

कोरफडीचा एक चमचा गर रोज गरम पाण्याबरोबर घेतल्यास त्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता अत्यंत वेगाने वाढते. तसेच सांध्याच्या दुखण्यावरही त्याचा प्रभावी उपचार होऊ शकतो.

लसूण

लसणाच्या दोन पाकळ्या रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते. स्वाइन फ्लूसारख्या आजारामध्ये रोग प्रतिकारक क्षमता ही सर्वात महत्त्वाची ठरत असते.

कापूर

लहान गोळीच्या आकारातील कापुराच्या एका गोळीचे सेवन केल्यास त्याचाही स्वाइन फ्लूबरोबर लढा देण्यात मह्त्त्वाचा वाटा ठरू शकतो. पण त्याचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...