केळीच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सर्वांनाच माहिती आहे, परंतु केळीचे अनेक फायदे असून यापासून आपण अनभिज्ञ आहोत. केळी केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नसून या फळाचा त्वचा, केस आणि इतर घरगुती कामांमध्ये उपयोग केला जाऊ शकतो.
तणाव होतो कमी...
केळीचे सेवन तणाव कमी करण्यात सहायक ठरते. केळीमध्ये असलेले ट्रायप्टोफन नावाचे अॅमिनो अॅसिड मूड रिलॅक्स करते. तणावग्रस्त व्यक्तीने केळी खाल्ल्यास लवकर आराम मिळेल.
दात मोत्यांसारखे चमकतील...
तुम्हाला तुमचे दात मोत्यांसारखे चमकदार करण्याची इच्छा असेल तर केळीच्या सालीचा उपयोग करा. ब्रश केल्यानंतर केळीची साल दररोज दातांवर रगडल्यास दात चमकदार होतात.
बद्धकोष्ठता -
जर तुम्हला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर केळी तुमच्या कामाचे फळ आहे. दिवसातून दोन केळी खा आणि मग पाहा केळीमधील फायबर तत्वाने तुमची समस्या कशी दूर होते.
बूट चमकवण्यासाठी -
केळी बूट, लेदर, सिल्व्हरवर पॉलिशचे काम करते. केळीच्या सालीने बूट, लेदर, चांदीचे दागिने स्वच्छ केल्यास या वस्तूंची चमक पुन्हा दिसेल.
त्वचेसाठी फायदेशीर -
आतापर्यंत तुम्ही केळीचा उपयोग केवळ खाण्यासाठी केला असेल, परंतु यावेळी त्वचेसाठी केळीचा वापर त्वचा स्वस्थ आणि उजळ करण्यासाठी करून पाहा. केळीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्स हे तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पौष्टिक तत्व त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
त्वचेसाठी मॉयश्चरायजरचे काम करते केळी
केळी केवळ खाण्याचे चविष्ट फळ नसून, एक उत्तम मॉयश्चरायजरसुद्धा आहे. घरीच केळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धे पिकेलेले केळ घेऊन त्यामध्ये एक चमचा दही आणि अर्धा चमचा मध मिसळा. हे सर्व मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर फेसपॅक प्रमाणे लावा. 10-15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने तुमची त्वचा उजळेल.
टाचेच्या भेगा होतात नष्ट -
जर तुम्ही टाचेच्या भेगांमुळे त्रस्त असाल तर केळी यावर रामबाण उपाय आहे. पाय गरम पाण्यात ठेवून प्युमिक स्टोनने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टाचांवर केळी आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेले मिश्रण लावा. काही वेळानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. नारळ आणि केळीमध्ये वसा, व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे टाचा मुलायम होतात. (प्युमिक स्टोन - हा दगड बाजारात सहजपणे मिळतो)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.