महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय.
पेज
- मुख्यपृष्ठ
- शालेय परिपाठ
- शालेय पोषण आहार
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- रजा नियम
- शालार्थ help videos
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- जाती प्रवर्ग निहाय यादी (विद्यार्थी नोंदी )
- शालेय कविता इयत्तानिहाय
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- सेवापुस्तक विषयी माहिती
- डाउनलोड करा
- शासन निर्णय
- यशस्वी होण्याचे नियम
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
मंगळवार, १० मार्च, २०१५
पालखी सोहळा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Popular Posts
शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन
शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...
-
विशेष उल्लेखनीय नोंदी 1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो 2 शिवचरित्र समजून घेतो 3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो 4 ऐति...
-
special observational notes :- looks pictures and objects carefully can answer oral questions try to read pictures uses simple conv...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.