संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, ९ मार्च, २०१५

मराठी शिक्षणाची नवी बाराखडी

इंग्रजी लिहिता येत नाही याचा न्यूनगंड. मराठीत उत्तम व्यक्त होता येतं, पण ऑनलाइन जगात, कम्प्युटरवर मराठीत लिहिता येत नाही. फेसबुक, ब्लॉग्ज, त्याच्यावरच्या टिपण्या या सा:यात हिरीरीनं सहभागी होता येत नाही. कारण तिथं मराठीतून कसं लिहितात हेच माहिती नाही.

ते माहिती नाही म्हणून लिहायचं नाही आणि लिहित नाही म्हणून मराठीत उत्तम विचार व्यक्त होत नाहीत अशी ओरडही ऐकायची.

हे दृष्टचक्र समजा तोडलंच आणि अगदी सोप्या प्रयोगापासून सुरुवात केली तर?

त्यासाठीच ही एक ऑनलाइन मदत.

तुमच्या फोनवर, कम्प्युटरवर मराठीत कसं लिहायचं हे शिका.

आणि बिंधास्त मराठीत लिहा.

एक अॅप फक्त डाऊनलोड करून घेतला तर तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल.

तेही फुकट! पूर्ण मोफत!

 

 

 

 

गुगल हिंदी इनपुट

 

मोबाइलवर आणि ऑनलाइन लिहा मराठीत

 

तुमच्या मोबाइल फोनवरून मराठी टाइप करायचं असेल तर त्यासाठीचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे गुगल हिंदी इनपुट. 

प्ले स्टोअरमध्ये हे अॅप मोफत उपलब्ध आहे. 

सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे एकदा हे अॅप डाऊनलोड करून घेतलं की, इतर कीबोर्डसारखं तुम्हाला इंग्लिश की बोर्ड वापरायसाठी पुन्हा पुन्हा ‘की बोर्ड सिलेक्शन’ करावं लागणार नाही. कारण या एकाच कीबोर्डवर तुम्हाला हिंग्लिश आणि हिंदी असे दोन्ही पर्याय मिळतील. की बोर्डवरच हे दोन्ही पर्याय आहेत. त्यामुळे या कीबोर्डच्या मदतीने तुम्ही मराठी आरामात टाइप करू शकता. हा फोनिटक की बोर्ड आहे. म्हणून मग एरवी जसं तुम्ही इंग्लिशमधून टाइप करता, तसंच करून तुम्हाला मराठीत टाइप करता येईल.

हेच गुगल हिंदी इनपुट तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरही डाऊनलोड करून घेऊ शकता. ऑनलाइन लिहिताना म्हणजे जीमेलवर चॅटिंग, फेसबुक, ईमेल्स या सर्व ठिकाणी हे अॅप वापरून तुम्ही मराठीत लिहू शकता. हे अॅप इन्स्टॉल केलं की तुमच्या जीमेलमधेच तुम्हाला मराठीचा पर्यायही दिसेल. सध्या फोन आणि ऑनलाइन वापरासाठी, मराठीत सहज लिहिण्यासाठी हा सोपा आणि मोफत पर्याय उपलब्ध आहे.

 

हे अॅप https//play.google.com/

इथं जाऊन डाऊनलोड करता येईल.

 

****

 

 

ऑनलाइन की-बोर्ड

gate2home

 

आणखी एक सोपी वेबसाईट म्हणजे gate2home.com इथं तुम्हाला एक फ्री ऑनलाइन व्हच्यरुअल की-बोर्ड मिळेल. अनेक भाषांचे पर्यायही दिसतील. तिथं मराठी निवडून तुम्ही मराठीत लिहू शकाल.

 

***

तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर त्यासाठी गुगल हिंदी इनपुट आहेच, पण तुम्ही अगदी आयपॅड वापरत असाल तरीही तुम्हाला अनेक भाषांमधले की-बोर्ड प्रि-इन्स्टॉल्ड मिळतील. त्याच्या सेटिंगमधे जाऊन मराठी पर्याय निवडला तरी तुम्हाला सहज मराठीत लिहिता येऊ शकेल.

 

 

 

देश-विदेशातले अॅप्स आपण डाऊनलोड करून घेत असतोच,

पण आपल्या कामाचे खास मराठी अॅप्स आहेत.

ते डाऊनलोड करा,

मराठीचा ऑनलाइन वापर

अधिक सोपा होईल.

 

मराठी अॅप्स

 

 

इंग्लिश टू मराठी डिक्शनरी

खांडबहाले.कॉम

 

खांडबहालेंनी तयारी केलेली ही ऑनलाइन डिक्शनरी. अर्थात इंग्रजी-मराठी शब्दकोश. आता त्याचा अॅपही उपलब्ध झाला आहे. इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ पाहण्यासाठी हे अॅप उत्तम आहे. मुळात हे अॅप वापरायला एकदम सोपं आहे. त्यामुळे तु्म्हाला ज्या शब्दाचा अर्थ पाहायचा आहे, तो टाइप करायला लागल्यावर खाली सजेशन्स मिळतील. शब्द क्लिक केल्यावर त्याचा अर्थ मिळेल. शिवाय आणखी विस्तारात माहिती वाचायची असेल तर त्यासाठीची वेबसाईट लिंकही खालीच दिलेली आहे. 

https//play.google.com वर जावून khandbahale.com सर्च करा.

 

***

 

MPSC mission 2015

एमपीएससीची तयारी करणा:यांसाठी मार्गदर्शन करणारं हे अॅप. लेटेस्ट बातम्या, जनरल नॉलेज, क्वेश्चन बँक, करंट अफेअर्स क्विझ, रोजची सराव टेस्ट अशा अनेक गोष्टी यात आहेत. अभ्यास, रंजक माहिती, वेगवेगळ्या विषयांमधली फ्लॅश कार्डसही इथे आहेत. मुख्य म्हणजे ही सगळी माहिती मराठीत आणि मोफत उपलब्ध आहे.

 

***

लोकमत मराठी न्यूज

तुम्हाला तुमच्या फोनवर बातम्या हव्या असतील तर मग लोकमतचं अॅप हवंच. महत्त्वाच्या बातम्या, ताज्या बातम्या, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, संपादकीय अशा एका वर्तमानपत्रत असणा:या सगळ्या गोष्टी या अॅपमध्ये मिळतील. 

***

 

श्यामची आई

मराठीतलं साने गुरुजींचं अख्खं पुस्तक अॅपवर उपलब्ध आहे. ‘श्यामची आई’मधल्या सगळ्या गोष्टी हे अॅप डाऊनलोड करून वाचता येतील. 

 

***

याशिवाय दासबोस, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी या सगळ्यांची अॅप्स गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत. मराठी भजनं असणारीही काही अॅप्स आहेत. याशिवाय श्लोक, नित्यपाळ यासाठीचीही अॅप्स प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...