संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

सोमवार, ९ मार्च, २०१५

महिलांसाठी मोबाइल हेल्पलाइन अन् मदत केंद्र

महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सरकार वचनबद्ध आहे. महिलांसाठी खास एक थांबा केंद्रे व अडचणीच्या वेळी त्यांना वापरता येतील अशा मोबाइल हेल्पलाइन सुरू केल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संदेशात म्हटले आहे.
महिलांविरुद्ध जे गुन्हे घडतात ते ऐकून आमची मान शरमेने खाली जाते. पुरुष व स्त्रिया यांच्यातील असमानता दूर केली पाहिजे.  महिलांसाठी समानता व विकासाच्या प्रक्रियेत सहभाग असला पाहिजे व त्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. महिलांना  सन्मानाने जगता यावे यासाठी समान संधी त्यांना मिळाल्या पाहिजेत. हे स्वप्न साकारण्यासाठी इतरांच्याही सहकार्याची गरज आहे. हिंसाचारग्रस्त व पीडित महिलांसाठी कायदा सल्ला, मदत, मानसिक समुपदेशन या सेवा एकाच ठिकाणी मिळतील, अशी एक थांबा केंद्रे सरकार स्थापन करीत आहे. मोबाइल फोनवर १८१ क्रमांक फिरवून महिलांना मदत मिळवता येईल. ती हेल्पलाइन सुरू होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...