भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।। १ ।।
महाबली प्राणदाता सकळा ऊठवी बळे
सौख्यकारी दु:खहारी दूतवैष्णव गायका ।। २ ।।
दीनानाथा हरीरुपा सुंदरा जगदांतरा
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ।। ३ ।।
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।। ४ ।।
ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे
काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ।। ५ ।।
ब्रह्मांडे माइली नेणो आवळे दंतपंगती
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राटिल्या बळे ।। ६ ।।
पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी
सुवर्णकटिकासोटी घंट किंकणी नागरा ।। ७ ।।
आकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू
चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी ।। ८ ।।
कोटिच्याकोटि उड्डाणे झेपावे उत्तरेकडे
मंदाद्रीसारिखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे ।। ९ ।।
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती
मनासी टाकिले मागे गतीसी तूळणा नसे ।। १० ।।
अणुपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे
तयासी तूळणा कोठे मेरुमंदार धाकुटे ।। ११ ।।
ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके
तयासी तूळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे ।। १२ ।।
आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा
वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा ।। १३ ।।
धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समग्रही
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठे करूनिया ।। १४ ।।
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने ।। १५ ।।
हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली बरी
दृढदेवा निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे ।। १६ ।।
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।। १७ ।।
इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।
पेज
- मुख्यपृष्ठ
- शालेय परिपाठ
- शालेय पोषण आहार
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- रजा नियम
- शालार्थ help videos
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- जाती प्रवर्ग निहाय यादी (विद्यार्थी नोंदी )
- शालेय कविता इयत्तानिहाय
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- सेवापुस्तक विषयी माहिती
- डाउनलोड करा
- शासन निर्णय
- यशस्वी होण्याचे नियम
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
गुरुवार, २ एप्रिल, २०१५
श्रीमारुतिस्तोत्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Popular Posts
शालेय अंतरकुल क्रीडा स्पर्धा आयोजन
शालेय अंतरकुल (Inter-House) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात खिलाडूवृत्ती निर्माण करण्...
-
विशेष उल्लेखनीय नोंदी 1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो 2 शिवचरित्र समजून घेतो 3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो 4 ऐति...
-
प्रतिज्ञा (मराठी ) भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे , माझ्या देशातल्या समृद्ध आणि वि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.