Pages

संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

देह मंदिर चित्तमंदिर

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

Popular Posts

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक २१ जून २०२५ रोजी *महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ३, बादाडे, लातूर* येथे **आंतरराष...