१)सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना ॥ संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय देव० ॥ ३ ॥
(२)
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें । लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें । ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें । अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥ वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥ शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं । कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥ त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥
(३)
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥ हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥ जय जयजी गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥ अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥ कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥ भावभगतिसे कोई शारणागत आवे । संतति संपति सबही भरपूर पावे । ऐसे तुम महाराज मोको अति भवे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥
(४)
तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया । संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥ मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥ तुझिया द्वारीं आज पातलों । नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥ तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्येचा स्वामी दाता ॥ ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥ तूं माता, तुं पिता जगं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥ पामर मी स्वर उणें भासती । तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥ मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥
(५)
जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥ प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा । उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥ रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा । सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥ सारीगमपधनी सप्तस्वरभेदा । धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥ तातक तातक थैय्या करिसी आनंदा । ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥ अभयवरदा सुखदा राजिवदलनयना । परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥ ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना । मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ जय देव जय देव जय वक्र० ॥ ३ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.