मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

जुना स्मार्टफोन नव्याने वापरण्यासाठी टिप्स...


��सौजन्य - दिनेश बोधनकर ,अकोला.��

तुमच्या स्मार्टफोन किंवा आयफोनमध्ये एवढे फीचर्स असतात की, अनेकदा तुम्ही त्यांचा वापरही करत नाही. मात्र, तरीही एक-दोन वर्षात नव्या फीचर्सचा नवीन स्मार्टफोन विकत घेतला जातो. मग अशावेळी जुना स्मार्टफोन घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहतो किंवा कुणालातरी वापरण्यास देऊन टाकता. मात्र, तुमच्या घरातील जुन्या स्मार्टफोनचा वापरही चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यासाठी खास टिप्स-

 
जर तुम्हाला गाडीमध्ये गाणी ऐकण्याची आवड असेल, तर तुमचा जुना स्मार्टफोन तुमची ही आवड नक्की पूर्ण करु शकेल. त्यासाठी काही विशिष्ट अॅप्स तुमच्या स्मार्टफोन किंवा आयफोनमध्ये डाऊनलोड करावे लागतील. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन किंवा आयफोन गाडीच्या म्युझिक स्टिस्टमशी जोडता येईल.
 

जर तुम्ही GPS साठी आयफोन वापरत असाल आणि लँडस्केप मोडमध्ये पाहायचं असल्यास SBRotator (http://moreinfo.thebigboss.org/moreinfo/depiction.php?file=sbrotator4Data) डाऊनलोड करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला केवळ 200 रुपये खर्च करावे लागतील.

शिवाय, अँड्रॉईड स्मार्टफोनमध्येही GPS साठी वापरायचं असल्यास गूगल प्ले स्टोरवरुन अल्टीमेट रोटेशन कंट्रोल (https://play.google.com/store/apps/details?id=nl.fameit.rotate&hl=en) डाऊनलोड कराव लागेल.

 
या स्मार्टफोनला तुम्ही तुमच्या गाडीत ठेवू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापरु शकता. गाडीमध्ये गाणी ऐकण्यासाठी किंवा GPS सिग्नलच्या मदतीने रस्त्यांची माहिती मिळवण्यासाठी जुन्या स्मार्टफोन किंवा आयफोनचा वापर उत्तम वापर होऊ शकतो.

जर अँड्रॉईड स्मार्टफोनला डेटा कनेक्टिव्हिटी हवी असल्यासल तुम्ही नवा स्मार्टफोन कनेक्ट करु शकता. जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर टीथरिंगच्या सहाय्याने नव्या आयफोनला कनेक्ट करु शकता.

 
जुन्या काळात म्हटलं जायचं, मेलेला हत्तीच्या किंमतीही सव्वा लाख असते. त्याप्रमाणेच आज आपण म्हणू शकतो, जुना स्मार्टफोनही तुमच्यासाठी किंमती ठरु शकतो.

     

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD