संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

मोबाईल गरम होण्याची कारणे

मोबाईल दिवसागणिक स्लिम होत आहे. नवनवे फीचर्स, नवे मॉडेल्स इत्यादींमुळे मोबाईल अॅडव्हान्स होत आहे. डेटा प्रोसेसिंगची क्षमता वाढली आहे. स्क्रीन रिझॉल्युशन, कॅमेरा मेगापिक्सेल, डेटा मेमरी, रॅम इत्यादी साऱ्याच बाबतीत मोबाईल अॅडव्हान्स होत चालला आहे. मात्र, मोबाईल युजर्सची एक तक्रार नेहमी असते, ती म्हणजे मोबाईल गरम होतो. अनेकदा चार्जिंगदरम्यान मोबाईल गरम होतो. मोबाईल गरम होण्याची कारणं काय, हे मोबाईल वापरणाऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण अनेकदा मोबाईल गरम होणं धोकादायक ठरण्याची भीती असते.

मोबाईल फोन गरम होण्याची तीन कारणं असण्याची शक्यता आहे :

जेव्हा तुम्ही मोबाईल खूप वेळ ऑपरेट करता, त्यावेळी फोनच्या प्रोसेसरवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे मोबाईल गरम होण्याची शक्यता असते.

जेव्हा तुम्ही मोबाईल चार्ज करता, त्यावेळीही मोबाईल गरम होण्याची शक्यता असते आणि जेव्हा मोबाईल वायरलेससाठी काम करणाऱ्या रेडिओ सिग्नलवर जोर पडल्यास त्याचा परिणाम मोबाईल बॅटरीवर होतो. परिणामत: मोबाईल गरम होतो.

मोबाईल थोड्या फार प्रमाणात गरम होणं, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मात्र, मोबाईल जास्त गरम झाल्यास भीती असते. अशावेळी मोबाईल खिशातून काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यावा.

चार्जिंग करत असताना मोबाईल गरम झाल्यास थोड्या वेळासाठी चार्जिंग बंद करणं मोबाईलसाठी फायद्याचं ठरतं. मात्र, चार्जिंग कॉडच खराब असेल तर कॉड बदलल्याशिवाय उपाय नाही.

मोबाईल वारंवार गरम होत असल्यास मोबाईल कंपनीकडे तक्रार करायला हवी. शिवाय, सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दाखवायला हवा. ज्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...