संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

रविवार, २० डिसेंबर, २०१५

हाय-फाय राऊटर....

नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राऊटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवितात.

वाय-फाय तंत्रज्ञान हे नवीन राहिले नसले तरी त्याचा वापर आता घराघरांमध्ये होताना दिसतो. घरातील लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. या सर्वाना डेटा पॅकचा रिचार्ज न करता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी घरातील इंटरनेट जोडणीला वाय-फाय राऊटर लावण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. यामुळेच गेल्या वर्षभरात देशातील वाय-फाय राऊटर्सची मागणी तब्बल ४५ टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवाला स्पष्ट झाले आहे. पण अनेकदा वाय-फाय राऊटर्सची खरेदी करताना झालेल्या छोटय़ाशा चुकीमुळे रेंज मिळण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे वाय-फाय राऊटर घेताना त्याची निवड कशी करावी आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या राऊटर्सविषयी जाणून घेऊ यात.

वाय-फाय राऊटर निवडताना सर्वप्रथम आपण इंटरनेटचा वापर नेमका कोणकोणत्या कामांसाठी करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ घरगुती वापरासाठी किंवा लघु उद्योगांसाठी जर राऊटर्स आवश्यक असतील तर ते सिंगल बँड असले तरी उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला इंटरनेट गेमिंग किंवा मल्टिमीडिया वापर करायचा असेल तर तुम्हाला डय़ुएल बँड राऊटरची गरज पडेल.

सिंगल बँड किंवा डय़ुएल बँड

राऊटरची निवड करत असताना आपल्याला त्यावर बँड दिसतात. यामध्ये २.४ आणि ५ गीगाहार्टझ बँड नमूद केलेले दिसते. म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला वायररहित जोडणी उपलब्ध होणार आहे. ८०२.११ बी आणि जी उपकरणांसाठी २.५ गीगाहर्टझचे राऊटर उपयुक्त ठरते, तर ८०२.११ एम उपकरणांसाठी २.४ आणि ५ गीगाहर्टझचे राऊटर लागते. मात्र ८०२.११ एसीसाठी केवळ ५ गीगाहर्टझचे राऊटर लागते. ५ गीगाहर्टझचे राऊटर हे २.४ गीगाहर्टझच्या तुलनेत जास्त उपकरणांना किंवा अधिक जलद इंटरनेट जोडणी पुरवू शकते. मात्र या दोन्ही राऊटर्समध्ये सतत इंटरनेट जोडणी पुरवण्याची क्षमता नसते. यामुळे बरेच तास इंटरनेट जोडणी पुरविल्यानंतर काही सेकंदांसाठी ती खंडित होते. तुम्हाला जर सिंगल बँड इंटरनेट जोडणी हवी असेल तर तुम्ही २.४ किंवा ५ गीगाहर्टझचे राऊटर घेऊ शकता. मात्र डय़ुएल बँडसाठी तुम्हाला ५ गीगाहर्टझचे राऊटरच घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच राऊटरची जागा ठरविताना संपूर्ण घरात किंवा कार्यालयात रेंज येईल अशा प्रकारे ठेवणे फायदेशीर ठरले. एवढे करूनही काही उपकरणांवर इंटरनेट चालत नाही. अशा वेळी उपकरण कोणती वाय-फाय जोडणी स्वीकारणार हे लक्षात घ्यावे लागते. काही उपकरणे अशी आहेत की, ज्याला केवळ त्याच क्षमतेची वाय-फाय जोडणी लागते. मोबाइल, लॅपटॉपसाठी कोणतीही जोडणी चालू शकते. मात्र इंटरनेटशी जोडल्या जाणाऱ्या इतर स्मार्ट उपकरणांसाठी ही पातळी पाहणे गरजेचे ठरते. वाय-फाय राऊटरचे जागतिक प्रमाण हे ८०२.११ एन असे आहे. यापूर्वीचे व्हर्जन हे ८०२.११ एन ड्राफ्ट असे होते. यामुळे राऊटर खरेदी करताना ही काळजी घेणेही गरजेचे आहे.

जोडणीचा वेग

१५० एमबीपीस, ३०० एमबीपीस, ९०० एमबीपीस.. असे क्रमांक तुम्हाला वाय-फाय राऊटर खरेदी करताना दिसतील. याचा अर्थ हे राऊटर जास्तीत जास्त इतक्या वेगाने इंटरनेट पुरवू शकणार आहे. यामुळे राऊटर घेताना नेहमीच जास्त वेग क्षमता असलेले राऊटर घेणे फायदेशीर ठरते. याचबरोबर आपल्या घरातील इंटरनेट जोडणीतून किती वेग मिळतो हेही तपासणे गरजेचे ठरते. नाही तर मूळ वेग कमी असतानाच जास्त वेगाचे राऊटर घेऊन काही फायदा होणार नाही. अनेक ई-बाजार संकेतस्थळांवर १७५० एमबीपीस आणि १९०० एमबीपीसचे राऊटर्सही मिळतात.

राऊटरची सुरक्षा

नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राऊटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवितात. यामध्ये आपण खरेदी करत असलेले राऊटर ‘डब्लूपीए २’ आधारित आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे.

बाजारात उपलब्ध असलेले काही राऊटर्स

सिस्को लिंकसिस ई९००
*याद्वारे आपल्याला १४०० चौरसफुटांच्या अंतरात रेंज मिळणे सोपे होते.
*याचा वेग ३०० एमबीपीएसपर्यंत आहे.
*याची फ्रिक्वेन्सी २.४ गीगाहर्टझ इतकी आहे.
*याला चार लॅन आणि एक व्ॉन पोर्ट आहे.
*या राऊटरला अँटेना नाही.
*राऊटर ८०२.११ एनवर आधारित आहे.
*किंमत अंदाजे २००० रुपये
नेटगिअर डब्लूजीआर ६१४
*या आधारे आपल्याला १२०० चौरसफुटांच्या परिसरात रेंज मिळू शकणार आहे.
*याला पाच अथरनेट पोर्ट देण्यात आले आहे.
*हे राऊटर वायरलेस एन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
*याचा वेग १५० एमबीपीएस आहे.
*याची फ्रिक्वेन्सी २.४ गीगाहर्टझ इतकी आहे.
*किंमत अंदाजे १३०० रुपये
टीपी लिंक टीएल-डब्लूआर७४०एन
*याद्वारे आपल्याला ११०० चौरसफुटांच्या अंतरात रेंज मिळणे सोपे होते.
*याचा वेग १५० एमबीपीएसपर्यंत आहे.
*याची फ्रिक्वेन्सी २.४ गीगाहर्टझ इतकी आहे.
याला चार लॅन आणि एक व्ॉन पोर्ट आहे.
*राऊटर ८०२.११ एनवर आधारित आहे.
*याला यूएसबी पोर्टही देण्यात आला आहे.
*राऊटर एसएसआयडी तंत्रज्ञानाला पूरक आहे.
*किंमत अंदाजे २२०० रु.

��सौजन्य - दिनेश बोधनकर , अकोला.��

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...