संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

संगणक व गुन्हा

**

       संगणक सर्व्हरमध्ये संगणक मालकाची परवानगी न घेता प्रवेश करणे, त्याच्या ई-मेल अकॉऊँटमध्ये प्रवेश करणे किंवा लॉग-इन -आयडीमध्ये प्रवेश करणे  व हॅक करणे हा हॅंकिंगचा गुन्हा होतो.त्यासाठी माहीती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८च्या कलम ६६अनुसार गुन्हा होतो.त्यासाठी ३वर्षपर्यंत तुरुंगवासाची किंवा ५लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे .
       संगणकामध्ये आपला वैयक्तीकडेटा,कार्यालयाचा डेटा किंवा अत्यंत महत्वाची माहीती असते त्यावर कार्यालयाचा व्यवसाय निर्भर असतो.हार्ड डिस्कवरुन, पेन ड्रॉईव्ह, डीव्हीडी, सीडी,मोबाईल किंवा ई-मेल फॉरवर्ड करून तो डेटा स्वतः उपयोगात आणणे किंवा दुसऱ्याला मालकाला परवानगीशिवाय पाठविने हा डेटा चोरीचा गुन्हा होतो व तो सुध्दा माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा २००८च्या कलम ६६अन्वये गुन्हा असून त्यालाही वरीलप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे .
      व्हायरस पसरवून एखाद्या संगणकांतील डेटा खराब करणे व ते बुध्दीपुस्सररीतीने केले असेल तर तो माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००६च्या कलम ४३(सी) व ४३(ई) नुसार चूक आहे  व माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती)कलम ६६ नुसार फौजदारी गुन्हा आहे. भा.दं.वि.४६८ नुसार सुध्दा गुन्हा आहे.
       ईमेल,चॅट, मेसेजींग, एसएमएस,मोबाईल,फेसबुक,सोशल नेट्वर्किंग किंवा वेबसाईटचा वापर करून एखाद्याला घाबरवणे,छळने किंवा मानसिकत्रास देणे हा सायबर बुर्लीग  गुन्हा आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६६(अ)अन्वये गुन्हा होतो.वरीलप्रमाणे शिक्षा होऊ शकेल. भारतीय दंड विधानाचे कलम ५००,५०६,व ५०७अन्वये सुध्दा गुन्हा होतो. म्हणून फेसबुकवर किंवा अकॉऊँट वर स्वतः बद्दल खोटी माहीती देऊ नये. कुणाबद्द्ल विचित्र असे कमेंट्स लिहू नये . अभद्र अश्लील किंवा कुणाच्या भावना दुखावतील असे अभद्र लिहू नये .
       स्वतः ची ओळख न देता दुसऱ्याचव्यक्तीचे नाव धारण करून स्वतः ची खोटी ओळख देऊन फायदा उपटने व दुसऱ्याला नुकसान पोहचविणे हा गुन्हा माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती)कायदा २००८च्या कलम ६६(डी)अन्वये गुन्हा असून ३वर्षे तुरुंगव १ लाखरुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.भा .दं.वि ४१९अन्वये सुध्दा तोतयागीरीचा गुन्हा होतो.
     देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात यावी म्हणून जर कुणी अफवा पसरविणाऱ्य बाबी सायबर स्पेसमद्ये टाकेल,ई-मेल पाठवेल तर तो माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६६ (फ)अन्वये गुन्हा आहे.तसेच भा. दं. वि .च्या कलम १५३-ब अन्वये सुध्दा गुन्हा होईल .
      बोगस ई-मेल पाठवून कुणाला खोटी माहीती देणे व फसवणुक करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) व ६६(डी) नुसार गुन्हा आहे.तसेच भा.दं.वि कलम ४२० व  ४१५ अन्वये सुध्दा गुन्हा आहे .
       एखाद्या व्यक्तीचा ई-मेल आयडी हॅक करून बदनामी करणारा मेल केला जाणे व त्यामुळे ज्यांचा ई -मेल आहे तो नाहक बदनाम होतो.याला ई-मेल स्पुफिंग म्हणतात.अशा कृत्यासाठी माहीती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा ६६ (डी) नुसार गुन्हा होतो त्यासाठी ३ वर्ष तुरुंग व १ लाखारुपयांपर्यंत दंडच्या शिक्षेची तरतूद आहे.भा.दं.वि ४१७, ४१९,४६५अन्वये सुध्दा गुन्हा होईल .
       दुसऱ्याच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिटकार्डव्दारे  त्यांच्या संमतीशिवाय पैसे काढणे किंवा त्या कार्डच्या आधारे वस्तू खरेदी करणे किंवा बँकेला चुकीची माहीती देऊन क्रेडिट कार्ड किंवा डेबिटकार्ड मिळविणे हा माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८च्या कलम ४३(अ), ४३(ब) व ४३(सी) चा भंग असून या कायद्याला कलम ६६ अन्वये फौजदारी गुन्हा आहे. त्यासाठी ३ वर्षे तुरुंग व  ५ लाखांपर्यंत दंडच्या शिक्षेची तरतूद आहे.शिवाय भा.दं.वि. ४२०, ४६७,४६८,४७१ अन्वये सुध्दा गुन्हा होईल.
       एकाद्या लेखकांचा लेख पुस्तक, कविता, माहिती इत्यादीची चोरी करून स्वतः चे आहे असे भासवीने कॉपीराईट ॲक्ट ५१,६३,६३(अ)गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ च्या ६३अन्वये सुध्दा गुन्हा आहे .
       अश्लील चित्रे वैशयीक भावना चालवणारे मजकूर इंटरनेटवर प्रकाशित करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(अ)अन्वये व भा.दं. वि. च्या कलम २९२,२९३,२९४,५००,५०६, व ५०९ इत्यादी अन्वये प्रकरण परत्वे गुन्हा होईल.इंटरनेटव्दारे जुगार खेळने हा जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा आहे.
     वेबसाईट विद्रुप करणे,वेबसाईटवर बळजोरीने ताबा मिळविणे, बेकायदेशीरपणे वस्तु विक्रीस ठेवणे, वेबसाईटवर बदनामीकारक मजकूर लिहिणे, नक्कल करणे म्हणजे पायरसी  करणे. डिजिटल सहीबाबत बनावटीकरण करणे, फिशिंग करणे,संगणक नेटवर्क सर्व्हर इ.कामात व्यत्यय आणणे असे कृत्य गैरकायदेशीर असून त्यासाठी माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा २००८अन्वये गुन्हा होतो .
����������������
         ***********
रविंद्र अडसुरे, वकील सर्वोच्च न्यायालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Popular Posts

Student Portal वरील शाळांसाठी विद्यार्थी ट्रान्स्फर व संचमान्यते विषयीच्या सूचना

  1) एखाद्या शाळेने Attach , ट्रान्सफर , ट्रान्सफर(आऊट ऑफ स्कूल ) या Option द्वारे Request केलेले विध्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख...