रविवार, २० डिसेंबर, २०१५

विदयार्थी अप्रगत राहण्याची कारण आणि अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी काही उपाय

⚡ ⚡
१ - नियमित शाळेत न येणे.

२ - कमी वयातील प्रवेश.

३ - प्रत्येक मुलाची संपादणूक पातळी, अध्ययन क्षमता भिन्न-भिन्न असणे.

४ - न.प / जि. प. शाळांचा पालकवर्ग पाल्यांच्या शै. प्रगती बाबत उदासीन / जागरुकता कमी असणे.

५ - काैटुंबीक, सामाजिक परीसरात शै. वातावरणाची कमतरता.

६ - अध्यापनात शै. साधन, साहीत्याचा कमी वापर.

७ - संदर्भिय पुस्तकांची कमतरता.

८ - मुलांच्या कौटुंबिक समस्या.

९ - अध्यापनातील निरसता.

१० - मुलांची लेखन कौशल्य तुलनेने कमी विकसीत होणे.(तोंडी उत्तरे सांगता येतात, पण लिहीता येत नाही)

११ - शारिरीक समस्या जसे - आजार, चंचलता, अपंगत्व इ.

१२ - पायाभूत चाचणीतील प्रश्नांचे स्वरूप जसे - कल्पना करा यासारखे प्रश्न मुलांना सोडवताना अडचणी आल्या.

१३ - अशैक्षणिक कामाचा अध्यापनावरील परीणाम.


⚡  अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी काही उपाय योजना:-
१ -  पायाभूत चाचणीत न सोडवू शकलेल्या प्रश्नांचा (त्या स्वरुपाच्या) सराव घेणे.

२ -  शै. साहीत्याचा अध्यापनात अधिक वापर.

३ -  प्रत्येक मुलांचे मुल्यमापन वेगवेगळे करुन (निदान लावून) तसा उपचार करणे.

४ - लहान-लहान, मुलांना आवडतील, त्यांचे संबोध, संकल्पना स्पष्ट होतील असे भाषिक, गणितीय खेळ घेणे.

५ - लेखन कौशल्य अधिक विकसीत करण्याकडे लक्ष देणे.

६ -  कल्पनाशक्तीचा अधिक वापर करण्यासाठी उपक्रम घेणे.

७ - १ ते ९ ची अंक ओळख दृढ करणे.

८ - १ चा पाढा घेणे.

९ - वर्ग सजावटीत मुलांच्या प्रत्यक्ष सहभाग, जसे त्यांनी निर्माण केलेल्या कृतींचा समावेश.

१० - मूलभुत क्षमता विकास.

११ -  स्मरणशक्तींवर आधारित खेळ.

१२ -  शै. व्हिडीओ, तंत्रज्ञान यांचा अध्यापनात वापर.

१३ - पाढे बनविन्यांच्या विविध पध्दतीचा वापर.

१४ -  हवेत बोट फिरवुन अक्षरांचे, अंकाचे, शब्दांचा लेखन सराव घेणे.

१५ -  खेळाच्या तासात मातीत संख्या, अक्षर, शब्द लेखन घेणे.

१६ - पृथ्वकरण करुन शिकवणे.

१७ - १ ते ४ च्या वर्गासाठी पिरीयड सिस्टीम राबवणे.

१८ - गृहपाठ रंजकतापूर्ण देणे.

१९ - मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी विविध उपक्रम।

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD